
{“फार्मा कंपन्यांसोबत मिळून आर्थिक लुटीसह आरोग्याच्या खेळाचे षडयंत्र”}
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
वर्धा :- (दिनांक २९ डिसेंबर) एकीकडे शालेय विद्यार्थ्यांची अपार आयडी काढणे बंधनकारक नसल्याचे सांगणे, माहितीच्या अधिकारात शासनाने तेच उत्तर देणे, दुसरीकडे शिक्षकांवर दबाब आणून त्यांना वेतन थांबविण्याची धमकी देत विद्यार्थ्यांची अपार आयडी काढायला बाध्य करणे, हा दुहेरी खेळ कशाकरीता असे विचारण्याची पाळी आली आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य ताब्यात घेऊन उमलत्या पिढीसोबत फार्मा कंपनीच्या संगनमताना कोणता खेळ आडमार्गाने खेळला जात आहे.
याची विचारणा अपार आयडी काढण्याची जबरदस्ती करणाऱ्या शासकीय यंत्रणेला विचारण्याची पाळी शासनानेच आणली आहे.

“पुढील खेळ विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच” पालकांची संमती हा तर केवळ देखावा आहे. पुढील खेळ विद्यार्थ्यांच्या आरोग्यासोबतच होणार आहे. यात फार्मा कंपन्यांच्या पैसे लुटीचे कारस्थान असल्याचे सुप्त संकेत दिसायला लागले आहेत.
ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अपार आयडी याची १०० टक्के काढली नाही, त्यांना प्रमाणपत्र आणण्याची सक्ती करणे, अन्यथा वेतन थांबविण्याचा धाक दाखविणे, यातूनच कटकारस्थानाच्या षडयंत्राचा संशय यायला वाव मिळत आहे.
“उद्याचा दिवस उमलती पिढी बरबाद करण्यास टपलेल्या सरकारचा”कोरोना लसीच्या काळात जनलोकनायक प्रकाश पोहरे यांनी जनतेला सावध केले होते. आता अपार आयडी काढून तुमच्च्या मुलांचा आरोग्य, शैक्षणिक डाटा सरकारच्या स्वाधीन करू नका, हा सांगावा देत ते जिवाचा आटापिटा करून समाजाला सावध करीत आहेत.

तुमच्या मुलांच्या आरोग्य हिताचा आजचा दिवस तुमचा, उद्याचा दिवस उमलती पिढी बरबाद करण्यास टपलेल्या सरकारचा, फार्मा कंपनीच्या कारस्थानांचा, तसेच अपार आयडीच्या निमित्ताने सक्ती करीत शासनाचा अशी शासकीय यंत्रणेची पावले आडवाटेने पडत आहे. लोकस्वातंत्र्यांचा संकोच करण्याची एकही संधी सोडली जात नाही.
फार्मा कंपनीच्च्या आर्थिक हितसंबंधातूनच हे मुलांच्या जिवाशी खेळण्याचे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

“संस्था चालक, संचालक, मुख्याध्यापक, प्राचार्यांनो सावध व्हा”…! फार्मा कंपन्याच्या आर्थिक हितसंबंधाकरीता देशाच्या उमलत्या पिढीसोबत खेळ करायला सुरुवात झाली आहे. याकरीता शिक्षण विभागाच्च्या वतीने विनाकारण दबाव वाढविल्या जात आहे.
अपार आयडी भरून देणे याचा अर्थ त्या मुलांना शाळेत पालकांच्या संमती शिवाय फार्मा कंपन्या कुठल्याही गोळ्या, कुठलेही व्हॅक्सीन, कुठलेही इंजेक्शन, विना संमतीने देण्याची लिखित मुभाच आहे.फार्मा कंपन्यांचे षडयंत्र उधळून लावणे गरजेचे आहे.
शाळेतील मुले प्रयोगशाळेतील उंदीर म्हणजेच गिमी पिग नाहीत. अवेकन इंडिया मूव्हमेंटने जनहित उद्देशाने केलेल्या प्रयत्नामुळे आज कोरोना आणि कोरोना लसीबाबत अनेक बाबी उघड झाल्या आहेत. त्यामुळे आपण सध्या फॉर्म भरून देण्यामध्ये उगाच पुढाकार घेऊ नका आणि पापाचे धनी होऊ नका हे नम्रपणे सुचवीत आहे.
“फार्मा कंपन्यांचेच हित साधले होते कोरोना काळात”कारस्थान लस घ्यायची सक्ती करायला लावून फार्मा कंपन्यांचे हित साधले होते. त्यातून सरकारी यंत्रणेने प्रत्येकाचे शरीर गंभीर आजारांचे माहेरघर करून सोडले.
“आता अपारवर ठोस भूमिका घेण्याची वेळ आली”
आयडीच्या निमित्ताने उमलत्या पिढीच्या आरोग्यासोबत कारस्थान खेळले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कोरोना टॅक्सीन संदर्भात जेव्हा प्रकरण अंगावर आले असता आम्ही कोणावरच जबरदस्ती केली नाही असे सर्वोच्च न्यायालयात लेखी प्रतिज्ञा पत्र सरकारने दिले तसेच प्रतिज्ञा पत्र द्यायला शासकीय यंत्रणा मोकळी आहेच.सगळे आदेश मौखिकच दिले जात असल्याने मी नाही त्यातली.. म्हणायची पळवाट कायमच आहे.पालकांना वेठीस धरणाऱ्यांना आता पालकांनी त्यांच्या भावी पिढीच्या आरोग्यरक्षणाकरीता ठोस भूमिका घेण्याची वेळ आली आहे.
अन्यथा विद्यार्थ्यांना परस्पर औषध देऊन त्यांच्या शरिरांना आजाराचे माहेरघर करून ठेवायला पालकांनीच संधी दिली, या आरोपाच्या वलयात वावरावेलागेल. देशाच्याभावी पिढीसोबत शासन हे कपट कां करीत आहे? त्यांना काय साधायचे आहे? फार्मा कंपनीच्या कोणत्या औषधांना कारस्थान करीत विद्यार्थ्यांच्या शरिरात सोडायचे आहे? हे एकदा शासनाने स्पष्ट करावे.

अशी माहिती प्रकाश पोहरे, मुख्य संपादक दैनिक देशोन्नती, मो. ९८२२५९३९२१ यांनी प्रसार माध्यमातून दिली आहे.