
(कुमार चिंता यवतमाळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल)
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक 7 एप्रिल) शहरातील भगतसिंग वार्ड मधील एका विधवा महिलेच्या घरात घुसून तिला नग्न करुन बेदम मारहाण व जातीवाचक शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी देणाऱ्या गैरअर्जदार यांचे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखलकरणे बाबत लेखी तक्रार देण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, मी स्वाती अजय इंगळे, वय अं.27 वर्षे, जात बौध्द, धंदा मजूरी, रा. भगतसिंग वार्ड, उमरखेड, ता. उमरखेड, जि. यवतमाळ एक विधवा महिला असुन वरील ठिकाणी राहते. मला दोन लहान-लहान मुले असून, रोजमजूरी करुन मी माझ्या कुटुंबाचे पालन-पोषण करते. अश्यातच थोडेथोडके जमा केलेल्या पैश्यातून मी माझे घरातील नवीन संडासाचे बांधकाम सुरु केले आहे.

परंतु दिनांक 03/04/2025 रोजी अंदाजे सायंकाळी 5:45 वाजता तुझ्या संडासाचे बांधकाम करु नको असे बोलून माझ्याशी गैरअर्जदार : 1) जीवन साहेबराव शिंदे,2) मोहन साहेबराव शिंदे, 3) बेबाबाई साहेबराव शिंदे, 4) ज्योती साहेबराव शिंदे, 5) मंजू कदम,6) साहेबराव शिंदेसर्व रा. भगतसिंग वार्ड, उमरखेड, ता. उमरखेड, जि. यवतमाळ यांनी विनाकारण भांडण सुरु केले.मला माझ्या घरात नग्न करुन बेदम मारहाण करीत जातीवचाक शिवीगाळ केली व माझ्या गळ्यातील 4 ग्रामची सोन्याची पोत तोडून नेली.
याबाबत मी पो.स्टे. उमरखेड येथे तक्रार दाखल करावया गेली असता पो.स्टे. मार्फत फक्त एन.सी. दाखल करुन घेतलेला आहे.

या प्रकरणी पोलीस आरोपीला पाठीशी घालत असून त्यांची चौकशी करुन त्यांचेवर कडक कार्यवाही करावी अशी आपणांस विनंती आहे.वरील सर्व गैरअर्जदार हे मागील 2 महिन्यांपासून मला कोणत्या-कोणत्या कारणाने नाहक त्रास देत आहे.
म्हणुन मी 2 महिन्यांपुर्वी तक्रार दाखल केली असता माझी तक्रार घेतली नाही. उलट मलाच कायद्याची भिती दाखवून तक्रार देवू नको असा दम भरण्यात आला. त्यामुळे मी गैरअर्जदार यांच्या विरुध्द तक्रार देवू शकली नाही. पो.स्टे. उमरखेड यांनी 2 महिन्यापूर्वी माझी तक्रार घेतली असती तर माझ्यावर ही वेळ आली नसती. गैरअर्जदार मला मारहाण करीत असतांना सुनिल माने व अनिल वानखेडे यांनी मध्यस्थी करुन मला गैरअर्जदार यांचे तावडीतून वाचविले नसते तर कदाचित आज मी जिवंत नसते.

वरील गैरअर्जदार यांचेकडून माझ्या जिवीत्वास धोका असुन मेहरबान साहेबांनी गैरअर्जदार क्र. 1 ते 6 यांचेविरुध्द अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल त्यांचेवर कडक कार्यवाही करुन मला न्याय द्यावा. मला न्याय न मिळाल्यास नाईलाजास्तव मला उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, उमरखेड समोर उपोषणास बसावे लागेल.
अशी तक्रार यवतमाळ पोलीस अधीक्षक यांच्याकडे स्वाती अजय इंगळे यांनी केली आहे.