
🔵 300 शिरखुर्मा किट चे वाटप;जमाअत ए इस्लामी हिंद संघटनेचा उपक्रम 🔵
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड – (दिनांक 30मार्च) जमाते इस्लामी हिंद यास्वयंसेवी संघटनेच्या युवा व विध्यार्थी संघटनाची युध मुव्हमेन्ट महाराष्ट्र तसेच स्टुडेन्ट इस्लामी ऑर्गनायझेशन ऑफ इंडीया तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गोरगरीब जनतेलाही ईद साजरी करता यावी म्हणून सामाजिक बांधीलकी जोपासून फितरा वितरित करण्यात आले.

यात खिरखुरमाचे साहित्य,काजु, बदाम, किशमिश, साखर,खोबरा, डालडा, शेवाळ्या, खारीक , खोबरेलतेल, साबन, इलायची आदी साहित्य वितरीत करण्यात आले.

रमजान ईदचे खरे नाव ईदुल फित्र आहे. ईद म्हणजे उत्सव व फितरा म्हणजे दान म्हणूनच या ईदचे नाव’ दानो -उत्सव ‘ आहे. ईद च्या नमाज अदा करण्या पूर्वी फितरा दान अदा करणे अनिवार्य आहे.
ईदचा दिवसगोरगरीबांना कफल्लकांना व वंचितांना अंतकरणपुवर्क साह्य करण्याचा दिवस असतो.

पैगंबराचे फर्मान आहे की, ज्या ‘माणसाने ईदच्या नमाजपुर्वी गरीबांनाफित्रचे दान दिले नाही त्याचे रोजेअल्लाहजवळ स्विकारले जाणार नाही.ईदचा सन केवळ खान्यापिण्याची चंगळ, मौजमजा व मनोजरंनाचा नसून गोरगरीबांना सहानुभूती दाखविण्याचा त्यागाची भावना वृध्दींगत करण्याचा व गरजवंतांना मदतीचा हात देवून सुखी करण्याचाआहे. या महिन्याचे महत्वाचे पवित्रकर्तव्य म्हणजे फितरा हे पवित्र दान होय.

प्रत्येक मुस्लीम पुरूष, स्त्री,बालक, वृध्दांनी हे दान देणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे दरडोई सव्वा दोन किलो गहू अथवा त्यांची किंमत इतकी असतो. फितरा सार्वजनिक रित्या बैतुलमाल मध्ये जमा करण्याचे आदेश आहेत.

जमाते ईस्लामी हिंद दरवर्षीगरीब व गरजवंत लोकांचे संपुर्ण शहरात सर्वेक्षण करून यादी तयार करून लोकांपर्यंत या सार्वजनिक एकत्रीत निधीचा विनीयोग स्वातंत्र्यरित्या नियुक्त व प्रतिनिधीच्या सत्यानुसार करीत असते.जे लोक संघटनात्मकतेचे महत्वाचे मानतात व जे लोक बेतुलमाल एकत्रीतव निधीचे महत्व व फाद्याचे ज्ञान बाळगतात तसे लोक जमात मध्ये आपला फितरा कडधान्य व रोख रक्कमेच्यास्वरूपात जमा करतात.

वैयक्तीक रित्या फितरा वाटतांना खऱ्या गरजु लोकांपर्यंत पोहचत नाही. जे गरजवंत नाहीत तसेच जास्त लाभ घेतात व उपेक्षीत वंचित राहतात.

परंतु सार्वजनिकरित्या दान दिल्यामुळे तो जास्त लोकापर्यंत व खऱ्या गरजवंतांपर्यंत त्याचे वाटप होवून वैयक्तीक आत्मवस्तुचे दमन होते.तसेच घेणाऱ्या गरजवंतांचाआत्मसन्मान अबाधीत राखला जातो.
कारण फितरा म्हणजे भिक नव्हे तर हा गरजवंताचा अधिकार आहे. अशा प्रकारे प्रेषीत मुहम्मदयांनी धर्मविधीला समाजसेवेशी जोडले आहे. आजच्या काळात प्रेषितांच्या आदर्श समोर ठेवणे गरजेचे आहे.
हे फितरा पवित्र दान स्थानिक कार्यकर्त्यांनीअथक परिश्रम देवून समाजातील अपेक्षीत तसेच गरजवंतांना शहरातील प्रत्येक वार्डाच्या घरोघरी त्यांचा आत्म सम्मान अबाधित ठेवून वितरीतकरण्यात आला.