
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड – (दि ३० डिसेंबर) कॉलेज करून घराकडे जात असलेल्या युवकांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या टिपरने धडक दिल्याने १९ वर्षीय युवक जागेवटच ठार झाल्याची घटना सोमवार ३० रोजी दुपारी १.४५ वाजता दरम्यान बाळदी रोड वरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळ घडली.

अपघातात मृत्यू झालेल्या मूर्तकाचे नाव अजित गजानन राठोड रा. कृष्णापुर तांडा ता. उमरखेड असे असून आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एम एच २९ सीजी ३५१९ हा असून दुपारी कॉलेजवरून घराकडे जात असताना मागून येणाऱ्या MH एम एच ४८ टी ५५८० या टिप्परने जोरदार धडक दिल्याने बाळदी रोडवरील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा जवळ अजित यांचे जागीच मृत्यू झाला.
अजित राठोड हा गोपिकाबाई सिताराम गावंडे महाविद्यालयात इयत्ता अकरावी मध्ये शिकत होता.

सदर अपघाताचे फिर्याद मृतकाचे वडील गजानन गोकुळ राठोड व ४० वर्ष यांनी पोलीस स्टेशन फिर्याद दिली असून वाहन चालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.सदर अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.