
✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍️ सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 5 एप्रिल) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात पोलीस विभागाकडून शांतता कमिटीचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीराम जयंती उत्सव,महावीर जयंती, हनुमान जयंती,गुड फ्रायडे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने शहरात व तालुक्यात जयंतीचे उत्सव आनंदात साजरे व्हावे. या उद्देशाने शांतता सभेचे आयोजन करण्यात आले होते.

या शांतता बैठकीला जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप प्रामुख्याने उपस्थित होते त्याचप्रमाणे या विभागाचे आमदार किसनराव वानखेडे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भाऊ भुतडा, माजी आमदार विजयराव खडसे,एडवोकेट संजय जाधव, विधी तज्ञ एडवोकेट संतोष जैन, बळवंतराव नाईक,शिवाजीराव पाटील माने आपला जीन प्रेस अध्यक्ष व विविध उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

यावेळी आपल्या प्रस्ताविक मनोगतातून श्रीराम जयंती उत्सव, महावीर जयंती उत्सव,हनुमान जयंती उत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व गुड फ्रायडे या उत्सवा दरम्यान सर्वांनी शांततेत उत्सव साजरा करण्याचे आव्हान पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांनी केले. यावेळी श्रीराम उत्सव समितीचे श्री उलंगवार अध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

त्याचप्रमाणे महावीर जयंती उत्सव समितीच्या वतीने एडवोकेट संतोष जैन यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच श्रीराम जन्मोत्सव समितीचे सिद्धूभाऊ जगताप यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.


तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांनी जयंतीनिमित्त कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तसेच एडवोकेट संजय जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यादरम्यान विद्यमान आमदार किसन वानखेडे यांनी शहरात शांतता व सलोखा राखण्याचे आव्हान करीत आपले म्हणाने शांतता कमिटीत पटवून दिले.

यावेळी जिल्हा समन्वय नितीन भाऊ भुतडा,माजी आमदार विजय खडसे, अनिल काळबांडे अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शांतता व सलोखा अबाधित ठेवावा असे आव्हान केले.

सदर शांतता कमिटीला शेकडोच्या संख्येने शांतता समितीचे सदस्य पत्रकार बांधव व शहरातील जेष्ठ नागरिक व महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.