
[कारवाई एक गावठी बनावटीचा देशी कटटा (पिस्टल) व दोन धारधार लोखंडी तलवार जप्त.]
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 6 एप्रिल) रामनवमी सण उत्सवात व शांततेत साजरे व्हावे.

याकरीता यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र (अग्नीशस्त्र) बाळगणा-या तसेच अ उघड गुन्हे, उघड करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिता (भा.पो.से) यांनी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते.
त्या अनुषंगाने दिनांक 05/04/2025 रोजी उमरखेड पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शंकर पांचाळ व पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या संयुक्त मार्गदर्शनात दोन वेगवेगळी पथके तयार करुन उमरखेड पोलीस स्टेशन हददीत कारवाई करण्याचे आदेशित केले होते.

त्याप्रमाणे पोउपनिरी सागर इंगळे व त्यांचे पथकांने मिळालेल्या गोपनिय माहीती नुसार इसम नामे विजय गणेश भिमेवाड रा. शिवाजी वार्ड उमरखेड ता. उमरखेड यास चुरमुरा डॅम परिसरातून शिताफिने त्यास ताब्यात घेवून त्याची झडती घेवून त्याचे कमरेला एक गावठी बनावटीचा देशी कटटा (पिस्टल) व मॅगजीन त्यामध्ये 6 राउड किंमत 15,000 रु.ची मिळून आल्याने जप्त करुन ताब्यात घेतले.तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पथकांस मिळालेल्या गोपनिय माहीती नुसार त्यांनी इसम नामे-शोएब ऊर्फ शेख इब्राहीम शेख रहीम रा. अहेबाब कॉलनी उमरखेड यांचे घरी जावून त्याचे घराची पंचा समक्ष घरझडती घेवून दोन लोखंडी धारधार तलवार किंमत 3500 रु मिळून आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेतले.

अशा प्रकारे गुन्हे प्रगटीकरण पथक उमरखेड व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी रामनवमी सणाच्या पुर्व संध्येला संयुक्तीकरित्या इसम नामे 1) विजय गणेश भिमेवाड वय 23 वर्ष रा.शिवाजी वार्ड उमरखेड ता.उमरखेड जि. यवतमाळ यास ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द उमरखेड पोलीस स्टेशन येथे कलम 3, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये तसेच 2) इसम नामे शोएब ऊर्फ शेख इब्राहीम शेख रहीम वय 20 वर्ष, रा. अहेबान कॉलनी उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांच्या विरुध्द उमरखेड पोलीस स्टेशन येथे कलम 4, 25 भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद केला.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, मा. पोलीस निरीक्षक श्री. शंकर पांचाळ

सा. उमरखेड पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक गजानन गजभारे, मा. सहा पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे सा, पोउपनि/शरद लोहकरे, स्थागुशा यवतमाळ, पोउपनि सागर इंगळे गुन्हे प्रगटीकरण पो स्टे उमरखेड, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोहवा/कुणाल मुंडोकार,
पोशि/सुनिल पंडागळे, चापोकॉ राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, पोहवा/दिनेश चव्हाण, पोहवा गिरीष बेंद्रे, पोशि/संघशिल टेंभरे, पोशि/निवृत्त महाळनर, पोशि/प्रफुल घुसे पोलीस स्टेशन उमरखेड यांनी संयुक्तरित्या यशस्वीपणे पार पाडली आहे.