🔵 ✍️प्रा.भावना मनोज तायडे 🔵 (मराठी विभाग प्रमुख) [श्री. विट्ठल रुक्मिणी महाविद्यालय सवाना तालुका महागाव जिल्हा यवतमाळ]

अन मी बाप झालो……. आमची मोठी मुलगी म्हणजे अवघ्या तीन वर्षाच्या मुलीला कडेवर घेता सुद्धा येत नव्हते.घरचा एकुलता एक लाडात वाढलेला मुलगा कधी कोणती जवाबदारी माहीत नाही पण प्रथमच एवढी मोठी जवाबदारी काळजीने पार पाडणाऱ्या माझ्या पती बद्दल माझ्या डोळ्यात आदर खूप वाढला.
पहिले बाळंतपण माहेरी झाले तर दुसरे माझ्या सासरीच करावे हा माझा हट्ट तसे पाहता बाळ ज्या परिवाराचे आहे त्याच परिवाराने जवाबदारी घ्यावी. मुलीच्या माहेरच्यांनी ती करावी हे अयोग्य आहे. ही आपल्या समाजाला लागलेली चुकीची परंपरा आहे ह्या मताची मी,मग काय सासूबाई कधी आई होत नसते खरे ठरले.पण माझे पती माझी आई आणि बाबा झाले.दोन दिवसा पूर्वीच माझी ७५ वर्षाची आजी घरी आली होती आणि माझ्या आई बाबांच्या नवीन घराचा वास्तूशांती चा कार्यक्रम होता त्यांची ती तयारी चालू होती सकाळी अचानक माझ्या पोटात दुखु लागले.

अहो ना सांगताच चला लागा आता तयारीला, लग्नंमंडपी ज्या प्रमाणे वधुपिता ची जी अवस्था असते तीच अहोची झाली.महागाव मधील डॉक्टर कडे गेलो असता त्यांनी सांगितले वेळ केव्हाही येऊ शकते तुम्ही पुसद ला ऍडमिट होऊन जा.पण माझे म्हणणे होते थोडे थांबा जास्त त्रास झाला की जाता येते पण अहो म्हणाले “लगेच जाऊ मला भीती वाटते आहे,काही कमी जास्त झाले तर मी काय करू,मला काही सुचणार नाही”.त्यांच्या चेहऱ्यावर काळजी,भीती,जवाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्याचा आत्मविश्वास असे संमिश्र भाव जाणवत होते.आजी बॅग मध्ये समान भरत होती.

अहो आजी जे सांगते ते आणून देत होते,आजीने स्वयंपाक केला होता.अहो जसे ताटावर जेवायला बसले तसेच उठले,”घास पुढे ढकलतचं नाही ग” असे म्हणून जेवण संपवले.आमच्या तीन वर्षाच्या मुलीला आणि एका विश्वासाने शेजारी राहणाऱ्या त्यांच्या आई कडे गेले पण एक हतबल तेचा भाव आणि डोळ्यातील पाणी लपवत,निराशेने मुलीला घेऊन परत आले.माझ्या लक्षात आले आहोंच्या मनाला वेदना होत आहे, पण काही न बोलणे मला योग्य वाटले,
माझ्या आई बाबा ना कळवयचे तर त्यांच्या घरी वास्तुशांती कार्यक्रम सुरू, नेमकेच पूजेला बसलेले.मग गाडी साठी फोन केला आणि हॉस्पिटल साठी पुसद ला निघालो,रस्त्याने आजी मला पाणी पाजत होती,तोंडावरून हात फिरवत होती.अहोचे ड्रायव्हर सोबत बोलणे सुरू होते पण लक्ष सर्व माझ्यावर होते.ऍडमिट करून घेतल्या गेले.ब्लड कमी आहे ब्लड बँक मध्ये जाऊन व्यवस्था करावी लागेल असे डॉक्टर नी सागितले,लगेच मित्राला फोन करून टू व्हीलर मागवून घेतली,

आजी ला माझ्या पाशी ठेऊन मुलीला सोबत घेऊन ब्लड बँक मध्ये गेले चचौकशी केली असता लक्षात आले मला जे ब्लड हवे होते ते नव्हते.मग हॉस्पिटल ला परत आले. अहो आणि माझे ब्लड ग्रुप एकच,माझे चालेल का,असे डॉक्टर ला विचारून तपासण्या करून घेतल्या.डॉक्टर नी सी- सेक्शन करायचे आहे हे सांगितले,मग त्यासाठी लागणारी इंजेक्शन,औषद,आणून देणे,मुलीला कडेवर घेऊन हे सर्व ते करत होते मुलगी मध्ये मध्ये काहीही हट्ट करत होती तील सांभाळत अहो सर्व सांभाळत होती पोटामध्ये अन्नाचा एकही कन नाही, डिलिव्हरी होई पर्यंत एक शन सुद्धा शांत बसले नव्हते अहो…सायंकाळ झाली आणि हॉस्पिटल चा गाऊन,युरीन पिशवी हातात आणि डोळ्या मध्ये अनामिक भीती घेऊन मी ऑपरेशन रूम मध्ये नर्स मला घेऊन जात होत्या.

सासरी जाताना नववधू ज्या प्रमाणे आपल्या वडलीलांच्या डोळ्यात पाहत त्या प्रमाणे मी अहो कडे बघत होती.अहोनी डोळ्याने माझ्यात आत्मविश्वास भरला.पण ही डोळ्यांची भाषा अहोंच्या कडेवर असणाऱ्या मुलीने हेरली काहीतर वेगळ होत आहे.तिच्या लक्षात आले आणि ती जोरात रडायला लागली. पूर्ण ३० मिनिटे ती रडत राहिली आहोनी तिला कसे सांभाळले काय माहित पण मी आली आहे असे ओरडत सांगत आमचे बाळ आले.छोट्या बाळाच्या रडण्याचा आवाजाने मुलीने पण रडणे बंद केले बाळाच्या गालाला स्पर्श करुन बागितले तेव्हा पासूनच माझ्या मुलाचा आणि मुलीचा वेगळाच बाँड(प्रेमाचा)तयार झाला.

औषधाची लिस्ट,आणि मुलीला घेऊन अहो मेडिकल मध्ये गेले. माझे पाय पूर्ण बधीर होते.एका बेडवरून दुसऱ्या बेडवर अहो आल्यावर मला उचलून टाकण्यात आले.बाळा साठी दूध पाहिजे म्हणून कितीतरी मित्रांना फोन केले शेवटी कुठून तरी गायीचे दूध आणले ते तपून घेतले.दूध ठेवण्यासाठी कॅन विकत घेतली ती स्वतः घासून धुऊन घेतली बाळाला चमच्याने दूध पाजले. सी सेक्शन मुळे बाळाला जवळ घेता येत नव्हते.मुलगी सकाळ पासून त्रासली होती ती सुद्धा रडत होती.
माझ्या कॉलेज च्या एका बाबू नी रात्रीचा डब्बा दिला.रात्री बाळ रडत होते आजी उठून बाळा दूध पाजत होती मुलगी अहोला बिलगून झोपली होती,अहोना काही झोप येत नव्हती,उठून मला पहायचं कधी बाळाला पाहायचे कधी मुलीच्या अंगावर पांगरून द्याचे,बाहेर फिरून यायचे असे करत रात्र गेली.सकाळी पुन्हा तोच कार्यक्रम औषध आणणे,फ्रूट,पाणी,आणणे मुलीला सांभाळले,मला उठून बसवणे,जेऊ घालने,केस विंचरून देणे,हात पकडुन रूम मध्ये चालवणे,कधी माझे डोके चेपून देणे सलाईन वर लक्ष ठेवणे आणि हे सर्व मुलीला सांभाळून केले.

स्वतःची झोप नको,पोटभर जेवण नको,आराम नको,असे चार दिवस चालू होते.पण छोट्या छोट्या गोष्टीवर कुरकुर करणारे माझे पती तेव्हा मला वेगळ्याच रुपात पाहायला मिळाले.कसलीही तक्रार न करता त्यांनी सर्व योग्य पार पडले,घरी आल्यवर म्हणजे आमच्या घरी कारण माझ्या आई ल पर प्यारालीसिस झालेला त्यामुळे तिने बाळंतपण करणे शक्य नव्हते,माझे पहिले बाळंतपण माझ्या आई क्या आई ने केले ती कोविड मध्ये गेली,मग माझी ७५ वर्षाची आजी,माझे पती यांनीच पूर्ण २ महिने जवाबदारी पार पडली.आणि मला नेहमी वाटायचे मझ्या बाबा प्रमाणे मला पती मिळावे पण इथे तर माझे पतीच माझे आई बाबा झाले.
जन्म झालेल्या मुलाचे आणि माझे असे माझे पती…… अन बाप झालेआवाज न करता,डोळ्यातून अश्रू न येता आपल्यासाठी रडणारा या जगात एकमेव व्यक्ती आहे ते म्हणजे आपला बाप…!

प्रा.भावना मनोज तायडे (मराठी विभाग प्रमुख)श्री. विट्ठल रुक्मिणी महाविद्यालय सवना तालुका महागाव जिल्हा यवतमाळ