
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक 31 मार्च) दिनांक 29/03/2025 रोजी फिर्यादी प्रताप मंगलचंद पडवाळे वय-50 वर्ष रा. सोनदाभी ता. उमरखेड जि. यवतमाळ यांचे फिर्यादवरुन पो स्टे उमरखेड येथे अप क्र 196/2025 कलम 303(2) BNS अन्वेय गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्ह्यात मा.पोनि शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डिटेक्शन बॅच चे प्रमुख पोउपनि सागर इंगळे व डि बी टिम यांनी सदर गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या बाजुच्या बस स्टॅण्ड येथे लावलेले पोलीस स्टेशनचे सी सी टि व्हि चेक केले,

असता त्यांना सदर आरोपी हा तेथे येवुन फिर्यादीची मो सा घेवुन जातांना दिसल्यावरुन पुढील सी सी टि व्हि चेक केले असता आरोपी हा बिटरगावचे रस्त्याने जात असतांना दिसल्यावरुन सदर सी सी टि व्हि फ्युटेज हे गोपनिय बातमीदार यांना दाखवुन सदर आरोपी संतोष पांडुरंग खंदारे वय 25 वर्ष, रा. पेंदा ता. किनवट जि. नांदेड असा असल्याचे निष्पन्न झाले.

वरुन सदर आरोपीचा शोध घेतला असता तो त्याचे घरासमोर चोरलेल्या मो सा सह दिसल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणुन त्याचे कडुन चोरी गेलेली एक हिरो कंपनीची पॅशन प्रो DRS मो सा जिचा क MH-29- AJ-7202 कि अं 30000/- रुपये चा वर्णणाचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बी जे हर्षवर्धन,


पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली डि बी प्रमुख पोउपनि सागर इंगळे, पोहेका/2020 संदिप ठाकुर पोशि/1652 टेंभरे, पोशि/1191 निवृत्ती महाळनर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका/2020 ठाकुर हे करीत आहे.