
(चार जिल्ह्याचे स्थळसिमेतुन तडीपार)
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 3 एप्रिल) पोलीस स्टेशन उमरखेड हद्दीत जाब देणार इसम नामे शेख तैमीर शेख समीर, वय-21 वर्ष, रा. ताजपुरा वार्ड उमरखेड जि. यवतमाळ हा चोरी करणे, जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे, दुकान जाळुन नुकसान करणे, तसेच जातीय तेढ निर्माण होईल.

अशा प्रकारचे गुन्हे करणे अशा प्रकारचे गुन्हे केले असता त्याचे वर वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करुन ही त्याचे वर्तवणुकीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे पोलीस स्टेशन उमरखेड तडीपार प्रस्ताव क्र 09/2024 कलम 56 (1) (अ) म पो का अन्वये मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब उमरखेड यांचे कडे सदर इसमाचा तडीपार प्रस्ताव पाठविला होता.
दि. 02/04/2025 रोजी मा. उपविभागीय दंडाधिकारी साहेब, उमरखेड यांनी सदर इसमास दोन (02) वर्षाकरीता यवतमाळ व जिल्ह्यालगतच्या नांदेड, वाशिम, हिंगोली या 03 जिल्याचे स्थळसिमेतुन हद्दीतुन तडीपार केले.
बाबतचा आदेश काढल्यावरुन सदर इसमास पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर इंगळे, पोशि/1652 टेंभरे यांनी सदर इसमास बाहेर जिल्ह्यात सोडण्याकरीता ताब्यात घेतले आहे.
सदर कारवाई यवतमाळ पोलीस अधिक्षक डॉ. श्री कुमार चिंता साहेब, मा. अप्पर अधिक्षक श्री पियुष जगताप साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हनुमंत गायकवाड सा., पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. उमरखेड डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक सागर इंगळे, पोहेका/28 राठोड पोशि/1652 टेंभरे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.