✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

पुसद (दिनांक १८ एप्रिल) बेलोरा ग्राम पंचायत यांनी विशेष ग्रामसभेमध्ये दि.२६/११/२०१५ रोजी घेतलेला ठराव रद्द करण्याबाबत मौजा बेलोरा ता.पुसद जि.यवतमाळ येथे शहीद सैनिक रामराव नामदेवराव सोडगिर यांचे शहीद स्मारक बौद्ध विहारासमोरील विवादित जागेवर उभारणी न करणे बाबत तक्रारी निवेदन पत्र मा.विभागीय आयुक्त साहेब यांचे कार्यालय अमरावती यांना देण्यात आले होते.


त्या अनुषंगाने सदर निवेदनाची दखल घेऊन मा.विभागीय आयुक्त साहेब यांचे कार्यालय अमरावती यांनी तात्काळ दखल घेऊन या विवादित जागेची पाहणी करून वास्तुस्थिती तपासून व चौकशी करून तात्काळ नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करणेबाबत तसे आदेश मा.विभागीय आयुक्त साहेब यांचे कार्यालय अमरावती यांनी मा.जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना देण्यात आले आहे.
