
[हा अपघात पैनगंगेच्या फुलावर पडलेल्या खड्ड्यामुळे झाला आहे.]
[विदर्भ- मराठवाडा सिमेवर धनोडा गावाजवळ अपघात ट्रक चालक गंभीर जखमी]

✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)✍🏻समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
यवतमाळ / नांदेड (दिनांक २९ डिसेंबर) विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून एक ट्रक नदीपात्रात कोसळला.धनोडा आणि माहूरच्या दरम्यान पैनगंगेच्या पात्रात आज शनिवार दि. २८. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास काळजाचा ठोका चुकविणारा हा अपघात झाला.
के.टी.सी. ट्रक (एच३४ एबी ४०२) माहूर मार्गे सिमेंट घेऊन यवतमाळ कडे निघाला होता, पैनगंगा नदीवरील अरुंद पुलावर येताच ट्रकच्या समोरील चाके निघाल्यामुळे अनियंत्रित झालेला ट्रक माहूरच्या हद्दीत पुलवरून थेट नदीत कोसळला.

अपघातानंतर झालेल्या भयंकर आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
ट्रकमध्ये चालक योगेश यादव राठोड (वय २४) रा.भवानी ता.उमरखेड जि .यवतमाळ या अपघातात गंभीर जखमी झाला. त्याला स्थानिकांच्या व जेसीबीच्या मदतीने खूप प्रयत्नानंतर क्याबिनच्या बाहेर काढण्यात आले.
चालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचांरासाठी माहूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

ऐका महिन्याखाली शेकापुर येथील ऐका व्यक्तीचा पूला वरून पडून मृत्यू झाला होता, हा अपघात सुद्धा फुलाला संरक्षण कठडे नसल्यामुळे जीव गमवावा लागला.
गेल्या कित्येक महिन्यांपासून संरक्षक कठडे नाहीत आणि पुलावर मोठ-मोठी खड्डे सुद्धा पडली, अनेक वेळा वेगवेगळ्या वृत्तपत्राला बातमी प्रकाशित करूनही सुद्धा दखल सुद्धा घेतलेली नाही.