
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✒️ सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड :- (दिनांक २० डिसेंबर) इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीपात्रासह कालव्याव्दारे सोडण्याचे योग्य नियोजन नाही.हिवाळ्यातच पैनगंगा आटल्याने नदीकाठच्या गावांना पाणीप्रश्नाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळेनदीपात्रात पाणी सोडण्याचे योग्य नियोजन व्हावे.

अशी मागणी उमरखेडचे आ. किसन वानखडे यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहात केली.इसापूर सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्याबाबत प्रशासनाकडून योग्य नियोजन होत नाही.

दरवर्षी नदीकाठच्या शेतकऱ्यांचे पाणीटंचाईमुळेबेहाल होतात. त्यामुळे प्रकल्पाचेपाणी पैनगंगा पात्रात योग्य नियोजन करून सोडावे, हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दानवनिर्वाचित आ. वानखेडे यांनीविधानसभेत उपस्थित केला.

हिवाळ्यापासूनच खेडेगावात नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.शेतातील ऊस यासह रब्बी पिकेवाळून जातील अशी भीती आहे.
पशुधनही पाण्यावाचून आक्रोश करीत आहेत. ही परिस्थिती गतवर्षी भाजपाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वानखडे यांनी मांडली होती.

आपल्या कार्यकर्त्यांसह नदीकाठावरील गावामध्ये जाऊनवाळलेल्या पिकांची पाहणी केली होती. त्यावरून त्यांनी १७ डिसेंबर रोजी विधानसभेतील अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा मुद्दामांडून आपल्या पंचवार्षिक कार्यकाळाचा प्रारंभ केला आहे.