
(“राष्ट्रभूषण” पुरस्कार जाहीर झालेल्या महाराष्ट्रातून भीम टायगर दादासाहेब शेळके यांच्यावर होतोय शुभेच्छाचा वर्षाव)

✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
मुंबई (दिनांक 21 जानेवारी) कल्याण येथे मंत्रालय वार्ता या संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल भिम टायगर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांना प्रतिष्ठेचा समजला जाणारा “राष्ट्र भूषण” पुरस्कार जाहीर झाला आहे.


भीम टायगर दादासाहेब शेळके यांनी 14 oct 2000 भीम टायगर सेना स्थापन करून भीम टायगर सेना सामाजिक संघटनाच्या माध्यमातून समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार विरोधी आवाज उठविला आहे.
शासनाच्या विरोधात महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर आक्रमक, धडाकेबाज व अभिनव आंदोलन केले आहे. तसेच प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या धडाकेबाज व आक्रमक शैलीने बहुजन समाज फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा पेरण्याचे कामही केले आहे. त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला आहे.

सदर पुरस्कार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी मुंबई कल्याण येथील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन फिल्म दिग्दर्शिका प्रख्यात गायिका निशाताई भगत व ज्येष्ठ पत्रकार ॲड. अनिल अहिरे यांनी आयोजन केले आहे.

माननीय दादासाहेब शेळके यांना राष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भिम टायगर सेनेच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी व इतर मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.