
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
✒️समाधान कांबळे (विशेष प्रतिनिधी)

पुसद (दिनांक २१ जानेवारी) तालुक्यातील मौजे. इसापूर या गावाचा रस्ता/रोड शेंबाळपिंपरी इथपर्यंत मंजूर असून चालू असलेला रस्ता अत्यंत बोगस पद्धतीचा होत आहे.

त्यात डांबर हे फक्त नावालाच वापरत करत असून काम कासव गतीने होत असून इसापूर पासून शेंबाळपिंपरी पर्यंत पूर्ण रस्ता उखरून ठेवला आहे व पूर्ण स्लोलीन टाकून ठेवले आहे. त्यामुळे येणारे जाणारे पडताना सुद्धा दिसून आले आहे.

गावकऱ्यांनी वारंवार ठेकेदाराशी संवाद साधून सुद्धा संबंधित ठेकेदार मुजरीची भूमिका घेत असून या कामाकडे प्रशासनाचे सुद्धा दुर्लक्ष दिसत आहे.

त्यामुळे नागरिकाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्यासाठी जन आंदोलन करण्याची नागरिकांमध्ये चर्चा दिसून येत आहे.