
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड:- (दिनांक २७ मार्च) आधुनिक तंत्रज्ञानाने जग जवळ येत आहे त्यातच शैक्षणिक स्पर्धा वाढत असल्यामुळे स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून डॉ. विजयराव माने यांनी ब्राम्हणगाव सारख्या गावात उपक्रम राबविला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असे विचार नांदेड येथील भार्गव करिअर अकॅडमी चे संचालक भार्गव राजे यांनी व्यक्त केले

ते ब्राह्मणगाव येथे भाऊसाहेब माने शैक्षणिक, कृषी, पर्यावरण ग्रामिण विकास संशोधन संस्थाच्या प्रांगणात आयोजित ज्ञान अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतानां बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. विजयराव माने हे तर प्रमुख पाहुणे म्हणून अँड अर्चनाताई माने, सरपंच परमात्मा गरुडे, डॉ. राजेश देशपांडे, रत्नाकर मुक्कावार,,अरविन्द धबडगे,माधवराव कोथळकर, नयन पुदलवाड, संजय सावंत, सुनील देवसरकर, बापूराव माने, प्रदीप माने, श्रीधर देवसरकर, बालाजी वानखेडे यांची या उद्घाटन प्रसंगी उपस्थिती होती.

मार्गदर्शन करताना भार्गव सर पुढे म्हणाले की, प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबुत असल्यास भविष्यात स्पर्धा परीक्षा देताना कुठलीही अडचण निर्माण होत नाही त्यासाठी इयत्ता ८ वी ते १२ पर्यन्तच्या विद्यार्थ्यानी या संधीचा फायदा घेण्याचा मोलाचा सल्ला दिला पुस्तकाशिवाय बाहेरचे कुठलेही प्रश्न परीक्षेमध्ये नसतात त्यामुळे पुस्तक वाचन करणे अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थ्यांनी पुस्तक वाचनाने मनाची एकाग्रता वाढते मेंदूची क्षमता भक्कम होते त्याचबरोबर मोबाईल मुळे मेंदूची क्षमता कमी होत असल्याने विद्यार्थ्यांनी मोबाईल पेक्षा वाचनावर भर द्यावा.
असे त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . गरीब कुटुंबातील मुलांनी चिकाटीने मेहनत केल्यास भविष्यात स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन करून देशाचे शिखर गाठता येते ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरात जाऊन शिक्षण घेणे व राहणे परवडणारे नसल्यामुळे ही सुविधा ब्राह्मणगाव येथे उपलब्ध करून दिल्यामुळे या संधीचा परीसरातील पालक वर्गाने व विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा व आपल्या पाल्यांचे भविष्य उज्वल करावे असे आव्हान भार्गव यांनी केले .

ग्रामिण भागात गुणवत्ता भरपूर आहे परन्तु सोयीसुविधा उपलब्ध नसतात त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणामध्ये मागे पडतात त्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञान अकॅडमीच्या माध्यमातून ही संधी अँड अर्चनाताई विजयराव माने यांनी केल्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घेऊन तुम्हीच तुमच्या भविष्याचे शिल्पकार व्हा ! असे सांगून सध्या स्पर्धेचे जग असून विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात स्पर्धा पार पडावी लागते.


स्पर्धेमध्ये विद्यार्थी टिकण्यासाठी कोडींग, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या तंत्रज्ञानांमध्ये विद्यार्थांना देखील कौशल्य हस्तगत असणे अत्यंत गरजेचे असल्यामुळे डॉ. विजयराव माने यांच्या दूरदृष्टीमुळे, अशा STEM प्रयोगशाळा विद्यार्थ्यांसाठी या वर्षी उपलब्ध होऊन या प्रयोगशाळेत विद्यार्थी प्रत्यक्ष कोडींग शिकतील, रोबोट तयार करतील, कृत्रिम बुद्धिमता विषयी आणि 3D प्रिंटिंग च्या माध्यमातून वेगवेगळ्या अँप च्या माध्यमातून डिझाईन शिकून प्रतिकृती निर्माण करण्याचे प्रयोग करतील.

जीवनात संघर्ष जो करतो तो खरा नशीबवान ठरतो असा मोलाचा संदेशही त्यांनी दिला आहे.
यावेळी विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची सुलभ व सोप्या भाषेत समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांचे व पालकांचे समाधान केले कार्यक्रमाचे संचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रा .महेश पानपट्टे यांनी मांडले.

चौकट:- ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना विद्येची उब देऊन ज्ञानार्जनाचे तूप निर्माण करू डॉ. विजयराव माने