
श्रीक्षेत्र माहूर शहरात महत्वाच्या संपूर्ण चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व माहूर टी पॉइंट आणि वसंतराव नाईक चौक मुख्य चौकात गती अवरोधक(स्पीड ब्रेकर) लावणे

माहूर (दिनांक 27 मार्च) शहर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असल्यामुळे येथे भारतभरातून लाखो भाविक भक्त दर्शनासाठी ये-जा करत असतात त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे असलेले माहूर शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक चौकामध्ये असणे महत्त्वाचे आहे जेणेकरून अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सीसीटीव्ही कॅमेरा मार्फत घेता येते.
माहूर शहरामध्ये नगरपंचायत कार्यालय माहूर मार्फत संपूर्ण शहरामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य आहे, सीसीटीव्ही बसविल्यामुळे शहरासह संपूर्ण चौकामध्ये चोरीचे प्रमाण किंवा अनुचित प्रकार घडू नये यावर नियंत्रण होईल.

त्यामुळे लवकरात लवकर सिसिटीव्ही बसविण्यात यावे व राज्य महामार्ग 361 तुळजापूर ते बुटीबोरी दरम्यान माहूरगड शहरापर्यंत जोडलेला राज्य महामार्ग 361 गेलेला असून माहूर शहर हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असल्यामुळे शहरालगत असलेले टी पॉइंट येथे व रेणुका माता मंदिरावरून माहूर कडे येणाऱ्या वसंतराव नाईक चौक येथे गती अवरोधक (स्पीड ब्रेकर) ची आवश्यकता आहे
त्या अनुषंगाने दोन्ही ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता असते या ठिकाणी दररोज काही ना काही छोटे मोठे अपघात होत असतात त्यामुळे येथे गती अवरोधक अत्यंत महत्त्वाचे आहे.

यासाठी माहूरचे मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे व गती अवरोधक बसवून द्यावे असे निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघातर्फे देण्यात आले.
प्रतिलिपी म्हणून 1) मा.श्री राहुल कर्डीले,जिल्हाधिकारी नांदेड.
2) मा.श्री किशोर यादव, तहसीलदार, माहूर. यांना देण्यात आले.