
(महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल वायरल बातमीची नगरपालिकेने घेतली दखल)

उमरखेड (दिनांक 28 मार्च) शहरातील मागासवर्गीय वस्तीतील सार्वजनिक पुरुष व महिला शौचालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील शौचालय मागील दीड ते दोन महिन्यापासून हे शौचालय रिपेरिंग / दुरुस्तीचे काम पूर्ण होऊनही अद्यापही नागरिकांच्या सेवेकरिता सुरू करण्यात आले नव्हते.

पण मागील दोन दिवसा पूर्वी महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनलच्या मागासवर्गीय वस्तीतील सार्वजनिक शौचालय त्वरित सुरू करा…! अशी मागणी प्रफुल दिवेकर शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी आणि सिद्धार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड यांनी महाराष्ट्र वायरल न्यूज चैनल चे मुख्य संपादक बबलू भालेराव यांच्या यूट्यूब न्यूज चॅनेलच्या माध्यमातून प्रकाशित केली होती.

सदर बातमी ही सोशल मीडियावर वायरल झालेल्यामुळे उमरखेड नगरपालिकेने आज 28 मार्च 2025 रोजी सार्वजनिक शौचालय नागरिकांच्या सेवे करिता सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल च्या वायरल बातमीची दखल नगरपालिका उमरखेड प्रशासनाने घेऊन नागरिकांसाठी शौचालय सुरू करण्यात आले आहे.

सार्वजनिक शौचालय सुरू केल्यामुळे महाराष्ट्र वायरल कडून नगरपालिका प्रशासनाचे धन्यवाद व आभार व्यक्त केले जात आहे.अशी माहिती प्रफुल दिवेकर, सिद्धार्थ दिवेकर यांनी प्रसार माध्यमांना दिली.