
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक १६ जानेवारी) लिंगायत संप्रदाय महाराष्ट्र आणि कर्नाटकात पसरलेला एक महत्त्वाचा धार्मिक व आध्यात्मिक प्रवाह आहे.हा संप्रदाय १२ व्या शतकात कर्नाटकातील महात्मा बसवेश्वर यांनी स्थापन केला.

लिंगायत धर्माचे प्रमुख तत्त्वज्ञान ईश्वराचे व्यक्त स्वरूप “इष्टलिंग” म्हणून मान्य करणारे आहे.
महात्मा बसवेश्वरांनी परांपरागत आलेले कित्येक आचरण सोडवून, एक नव्या प्रकारचा भक्ती मार्ग आरंभिला व विश्वधर्माचे लक्षण असलेल्या लिंगायत धर्माची घटना जगदगुरू बसवेश्वरांनी निर्माण केली.

हदगाव मठ संस्थानाचे श्री सद्गुरु शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आज रोजी सकाळी ११ वाजता महात्मा बसवेश्वर अभ्यासिका शिरडकर कॉम्प्लेक्स, पुसद रोड उमरखेड येथे तालुक्यातील सर्व लिंगायत शाखेतील प्रमुखांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.कार्यक्रमाची प्रस्तावना रत्नाकर पुजारी यांनी केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विविध विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

शिवचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्याकडून अध्यक्षीय भाषणामध्ये बोलतांना सर्व लिंगायत शाखांनी एकत्र येऊन समाजा अंतर्गत संवाद वाढवावा तसेच लिंगायत कुटुंबाची गणना करण्यात यावी व त्यासाठी तालुकास्तरीय समितीचे गठन करण्यात यावे अशा मार्गदर्शक सूचना यावेळी देण्यात आल्या.बालाजी शिरडकर यांच्या वतीने आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

यावेळी डॉ. विष्णुकांत शिवणकर, सुनिल पाटील चिंचोलकर, विकास मुलंगे, अविनाश पोंगाणे, विकास डांगे, सुनिल चेके, अमोल चांदले, सुनिल हिंगमिरे, विष्णू पोहरकर, रणजीत रणमले, विजय सोनुने, संतोष बीच्चेवार, रामेश्वर बिचेवार, नारायण वड्डे, रामचंद्र परडे, जयराम काळबांडे, सागर बारे, श्रीराम ठमके, प्रवीण कांडलकर, दत्तात्रेय हेलगंड, अनुप मुंगे, गजानन झाडे, बापुराव भोसीकर, बबन चौधरी, माधव चौधरी, श्रावण चांदले, गजानन झाडे,जयराम काळबांडे तसेच मोठ्या संख्येने तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.