
[हदगाव तालुक्यातील महाताळा येथे बुद्धाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न]
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
हदगाव (दिनांक 15 जानेवारी) बुद्धाचा धम्म जीवित मानवासाठी असून मानव धम्मा मधील केंद्रबिंदू आहे. धम्मामध्ये जाती वादाला थारा नसून संपूर्ण मानवाच्या कल्याणासाठी आहे.धम्माचे पालन केल्यास मानवाचे कल्याण होते.असे प्रतिपादन भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके हे सम्यक बुद्ध विहार महाताळा येथे बुद्ध मूर्ती प्राणप्रतिष्ठान सोहळ्यानिमित्ताने बोलत होते.

यावेळी पूज्य भदंत तिस्सा नाग मुंबई भिकुंनी इरशीदिना यांच्या हस्ते बुद्धाच्या मूर्तीची स्थापना झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्यानोधरावसूर्यवंशी प्रमुख पाहुणे गुणवंत काळे होते. पुढे बोलताना दादासाहेब शेळके म्हणाले. आपल्या गावामध्ये बुद्धाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना करण्यात आली.खरी परंतु तुमच्यावर सुद्धा मोठी जबाबदारी पडणार आहे.

सकाळ सायंकाळी बुद्ध वंदना घेऊन बुद्धविहार स्वच्छ ठेवावे दररोज बुद्धविहारा विकास अधिकारी रमेश मुपड़े, सरपंच नितीन कुलदीपकर, देवानंद पाईकराव, सिंघम ढंगे. विनोद निकाळजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश नरवाडे. प्रा. राजेश राऊत, राष्ट्रपालदादा सावतकर, गौतम वाठोरे, संघपाल पाईकराव, चंद्रमुनी पाईकराव, मिलिंददादा पाईकराव, स्वींद्र गिरबिडे, संदीप दवणे,गुलाब दवणे, सुरेश शेळके, अनिल शेळके इत्यादी उपस्थित होते.

मध्ये येऊन वंदन करावे व आपल्या लहान मुलावर सुद्धा तेच संस्कार द्यावे त्यामुळे आपल्या जीवनाचे कल्याण होईल या जगाला बुद्धा शिवाय पर्याय नाही धम्म हा सागरा सारखा असून तिथे जातीभेदाला थारा नाही.
एका ठीकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तथागताने दिलेल्या धम्माचे पालन करावे जर आपण पालन नाही केले तर हा पवित्र धम्म महारानी बाटवला असे लोक आपल्याला म्हणतील! यामुळे धम्माचे पालन करून २२ प्रतिज्ञाचे पालन करावे.

असे डॉ. बाबासाहेब आबेडकर म्हणतात.म्हणून आपण बाबासाहेबाचे विचार आता धावपळीच्या युगामध्येसुद्धा बुद्धाच्या धम्माचे पालन केल्यास मानवाचे कल्याण होते.

यामुळे जीवन सुखकर बनते असे मत भिम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश राऊत यांनी केले तर आभार सरपंच नितीन कुलदीप यांनी मानले.