
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
✍🏻 समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
नांदेड (दिनांक १० जानेवारी) RTO ऑफिसचे मोटार वाहक निरीक्षक श्री. अभिजीत कोळी सर व सहाय्यक मोटार वाहक निरीक्षक श्री. संजय भोसले सर यांनी विद्यार्थ्यांना रस्ता अपघात टाळण्यासाठी उत्कृष्ट मार्गदर्शन केले.

माहूर दिनांक 08/01/2025 रोजी जगदंबा विद्यालयात प्राचार्य विश्वास जाधव सर यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा अभियान 2025 परवाह care अंतर्गत नांदेड (RTO) ऑफिसचे मोटर वाहक निरीक्षक श्री. अभिजीत कोळी सर व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्री. संजय भोसले सर

यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत रस्ते अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी व वाहतुकीच्या विविध नियम व नियमांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या शिक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. यावेळी रस्त्याने वाई चालताना सर्वांनी उजव्या बाजूने चालण्याचे आवाहन ही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अविनाश सातव यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.