
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 10 जानेवारी) शहरातील रेस्ट हाऊस येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघाचे अध्यक्ष शामभाऊ धुळे, उपाध्यक्ष सिद्धार्थ दिवेकर, सचिव प्रसेनजीत दिवेकर, कार्याध्यक्ष निशांत मनवर इत्यादी पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छा आणि पेन व वही देऊन गौरव करण्यात आला.

पत्रकार दिनानिमित्त उमरखेड येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पत्रकारांच्या सन्मानासाठी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता.


यामध्ये उमरखेड तालुक्यातील उमरखेड प्रेस क्लब पत्रकार संघ यांच्याबरोबर दर्पण संपादक पत्रकार संघ, महात्मा फुले पत्रकार संघ, संयुक्त पत्रकार संघ, दैनिक वृत्तपत्र वार्ताहर यांच्या इतरही पत्रकार संघाचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.