
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
महागाव (दिनांक 3 जानेवारी) तालुक्यातील फुलसावंगी गावामध्ये अवैध मटका व जुगार पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने अनेक काउंटर खोलून सुरू केले आहे. रोजची लाखो रुपयाची उलाढाल या जुगार आणि मटक्यावर होताना दिसत आहे.


यामुळे फुलसावंगी परिसरातील जनता, नागरिकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे छोट्या, मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे.


याकडे पोलीस प्रशासनाचे कोणत्याही प्रकारचे लक्ष नसून या गुन्ह्यामध्ये वाढ होतांना दिसत आहे.
या परिसरामध्ये कौटुंबिक वादविवाद मोठ्या प्रमाणावर होत आहेत. जुगार व मटक्यापायी नागरिक घरातील जीवनावश्यक वस्तू विकून जुगार व मटका खेळण्यासाठी जात आहेत. तसेच तरुण, विद्यार्थी यांच्यावर सुद्धा रोडवरच खुलेआम सुरू असलेल्या मटक्याचे काउंटरमुळे विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात येत आहे. हे सर्व पोलीस प्रशासनाच्या लक्षात येत असून जाणून बुजून या गोष्टीकडे पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

म्हणून माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ यांनी तात्काळ या फुलसावंगी परिसरातील अवैध जुगार अवैध मटका बंद करण्यात यावा आणि नागरिकांना सुखी जीवन जगण्याकरिता अवैद्य धंदे हद्दपार करावे तसेच संबंधित पोलीस कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी नागरिकांनी मागणी करीत आहेत.