✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड (दिनांक २७ डिसेंबर)विदर्भ व मराठवाड्याची सीमा असलेली पैनगंगा नदीचा मोठा भाग उमरखेड तालुक्यात असून या नदीतून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केली जात आहे.तिवरंग ,झाडगाव,हातला,नांदला,दिवट पिंपरी, मार्लेगाव व नदी काठी असलेल्या शेत शिवारातून वाळूमाफिया राजरोस वाळूचोरी करत आहेत.मात्र, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
वाळूमाफियांनी तालुक्यातील पैनगंगा नदीकिनारे पोखरले असून हे किनारे पावसाळ्यात धोकादायक ठरू शकतात. उमरखेड महसूल विभाग अंतर्गत असलेले वाळूच्या पेंढावर व वाळुचोरीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे लावावेत अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
वाळूमाफियांकडून सुरू असलेली वाळूचोरी उमरखेड तालुक्यात मोठा प्रश्न बनला आहे.वाळूचोरीतून अनेकांनी बेकायदा रोजगार शोधला असला तरी पैनगंगा नदीवरील हे बेसुमार वाळू उत्खनन पर्यावरणाच्या दृष्टीने धोकादायक आहे.
वाळूचोरीमुळे दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून महसूल प्रशासन वाळू चोरीवर कोणतीही कारवाई करत नाही. तसेच रस्त्यावरून होणारी वाळूच्या चोरट्या वाहतूककडेही दुर्लक्ष करण्यात येते.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरु असून येथे बांधकामाला लागणारी वाळू चोरीच्या मार्गाने अव्वा कि सव्वा भावाने विकत आहे. याचा सर्वात मोठा फटका महसूल विभागाला बसत आहे. यामुळे शासनाचा कोटी रुपये महसूल बुडत आहे.
पैनगंगा नदीतून होणारा वाळू उत्खनन कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा संतप्त सवाल पर्यावरण प्रेमी करत आहेत.महसूल यंत्रणेने एक पाऊल पुढे टाकून वाळू चोरी होत असलेल्या परिसरात सीसीटिव्ही लावावेत अशी मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.