
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

नांदेड (दिनांक 12 डिसेंबर) परभणी शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालय समोर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकासमोर असलेल्या भारतीय संविधानाचे प्रतिकृती संविधानाच्या पुतळ्याची एका माथे फिरूनी विटंबना केली या घटनेचा पडसाद हदगाव शहरामध्ये उमटले आहेत तालुक्यातील आंबेडकरी जनतेमध्ये रोष निर्माण झालेला आहे.

संविधानाच्या प्रतिकृती पुतळ्याची विटंबना करणाऱ्या नराधमास ताबडतोब अटक करून कठोर अशी शिक्षा करण्याची मागणी भिम टायगर सेनेने केली आहे.

परभणी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची पुतळ्याची विटंबना ही जाणीवपूर्वक जातीवादी मानसिकता असलेल्या व्यक्तीने जाणीवपूर्वक कृत्य केले आहे.

यामुळे भारताची अस्मिता असलेल्या भारतीय संविधान अपमान प्रकरणी समस्त भारतीयवासियांच्या भावना दुखावल्या आहेत सदर प्रकरणी आरोपीची कसून चौकशी करून त्या पाठीमागे असलेल्या मास्टरमाईडला कोण याचा शोध घ्यावा.
चौकट :- आरोपीला माथे फिरू म्हणून आरोपीला पाठीशी घालण्याचा हा प्रकार आहे. आरोपीने भारतातील नागरिकांचा सर्वांचा ग्रंथ असलेला भारतीय संविधान या ग्रंथाचा अपमान केलेला आहे. अशा नराधमास कुणीही पाठीशी घालू नये अन्यथा भिम टायगर सेने तर्फे महाराष्ट्रात आंदोलन केले जातील – विशाल भालेराव (भिम टायगर विद्यार्थी युवा सेना जिल्हाप्रमुख)
शोधून काढण्यात यावे.अशा घटना भविष्यामध्ये घडू नये म्हणून राज्य सरकारने पुतळ्यास परिपूर्ण सुरक्षा देण्यात यावी. आरोपीस कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी भीम टायगर सेनेचे मुन्नाभाऊ वाठोरे, अंकुश सावते, मंगेश भुरे, माधवदादा भालेराव,सुरेश सावते, भगवान हटकर इत्यादींनी जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.