✒️शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड :- (दिनांक 10 डिसेंबर) नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी उमरखेड आगाराने कर्मचाऱ्यां साठी बसेस उपलब्ध करून दिल्या बद्दल आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके यांचा उप विभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी सत्कार केला. उमरखेड – महागांव या विधान सभा मतदार संघात २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली.

निवडणूक प्रक्रियेसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी यांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी उमरखेड आगाराने ३८ बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या.या बसेस योग्य नियोजन करण्यात सहायक कार्यशाळा प्रमुख प्रकाश भंदाडे, बस स्थानक प्रमुख जगदीश मनावर व लिपिक चक्रधर शिंदे यांचे चांगले सहकार्य मिळाल्या बद्दल या चमुचे ही उप विभागीय अधिकारी मुळे यांनी अभिनंदन केले.


उमरखेड बस आगारात सुमारे ७५ ते ८० बस गाड्या आहेत.प्रवाशी वाहतूक प्रभावित न होऊ देता आगार प्रमुखांनी ३८ गाड्या निवडणूक कामासाठी दिल्यात हे विशेष.