
✒️ (मुख्य संपादक)9823142014
✒️सिद्धार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
✒️करण भरणे सर (ढाणकी प्रतिनिधी) मो. 9421847351

ढाणकी (दिनांक 26 नोव्हेंबर) संविधान तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना २ वर्षे ११ महिने आणि १८ दिवस लागले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी पूर्ण होऊन त्याचा स्वीकार करण्यात आला. यानंतर, १ वर्षानी म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू करण्यात आली.

२०१५ मध्ये भारत सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.म्हणून आज भारतात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो याच निमित्ताने युवा ग्रामीण पत्रकार संघ ढाणकी कडून आज ढाणकी येथील संविधान चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून पेढे वाटून साजरा केला.

यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघ ढाणकी अध्यक्ष अशोक गायकवाड, महेबूब शेख, इरफान शेखजी, करण भरणे, रोहित वर्मा, प्रशांत अरेवाड, महाजन सर आणि मिलिंद चिकाटे उपस्थित होते.
