
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995469
उमरखेड :- (दिनांक 26 नोव्हेंबर) मुव्हमेन्ट फॉर पिस ॲन्ड जस्टिस ( एमपीजे ) या संघटने तर्फे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी 26 नोव्हे (संविधान दिवस ) ते 26 जाने (प्रजासत्ताक दिन ) पर्यंत संविधान सर्वासाठी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत आज 26 नोव्हेंबर 2024 रोजी संविधान दिना निमित्त सकाळी 10 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर संविधान उद्देशिके च्या वाचनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . यात सर्व संविधान प्रेमी – सामाजिक संघटना – नागरीकांनी सहभाग घेतला .डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.


या वेळी अनेक कार्यकर्तांनी संविधाना विषयी आपले विचार व्यक्त केले. सुत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते प्रा. गजानन दामोदर यांनी तर आभार प्रदर्शन एमपीजे शहराध्यक्ष मोहसीन राज यांनी केले.

या प्रसंगी व्ही एच हनवते ,उत्तम बरवड , देवानंद मोरे,आत्माराम हापसे, पत्रकार सिद्धार्थ दिवेकर, प्रा .गजानन दामोदर,गजानन भालेराव,वैशाली कवडे मोनिका पाईकराव, जयभिम गायकवाड, प्रकाश वाघमारे, गोविंदराव दरणे ,प्रफुल दिवेकर,अनिल मांगुळकर, हाफीज अन्सार,



मोहसीन राज,डॉ फारुक अबरार, इरफान खान ,प्रकाश चव्हाण,देविदास शेवाळे ,धम्मानंद काळबांडे, सैय्यद रजा, अ.जहीर, समीर अहेमद तसेच विविध सामाजिक संघटना, पक्ष, पत्रकार,संविधान प्रेमी नागरिक उपस्थित होते.


एमपीजे च्या 26 जानेवारी पर्यंत राबविण्यात येणाऱ्या अभियानात सर्व नागरिकांनी सहभाग व सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा सचिव हाफीज अन्सार हुसैनी यांनी केले होते.

