
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी मुख्य संपादक) मो.9823995466
✒️ करण भरणे (प्रतिनिधी ढाणकी)

महाराष्ट्र:- (दिनांक 14 नोव्हेंबर) महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागली असून पक्ष व अपक्ष उमेदवार तंत्रतज्ञान च्या साह्याने घरो घरी पोहोचण्याचा प्रयत्न करित आहे.

आज प्रचार करण्यासाठी उमेदवार आपण मतदाराजवळ कसे? पोहचावे..! या प्रयत्नात असताना आता डिजिटल दुनियामुळे त्यांना मतदाराजवळ आपले म्हणणे मांडणे सोपे झाले आहे.


उमेदवार आपला प्रचार मोबाईल च्या माध्यमातून पावरफुल असलेले सोशल मीडिया द्वारे त्यांच्या घरा घरात पोहोचत आहे. एकीकडे उमेदरावाचे प्रचारासाठी त्यांच्या डोक्यावरील ताण कमी झालं असून दुसरीकडे जनतेच्या मोबाईल वर वेगवेगळ्या उमेदवारांचे वारंवार येणाऱ्या कॉलमुळे डोक्यावरील ताण वाढले आहे.

महाराष्ट्रामध्ये उभे असलेल्या उमेदवारांनी जाहिरात कंपनीला आपल्या प्रचाराची पावती फाडून आपल्या प्रचाराची धुरा त्यांना दिली आहे. आणि महाराष्ट्रात पत्रकारिता करणारे पत्रकार बंधू यांना जाणून-बुजून दुर्लक्ष करून जाहिरात पासून दूर ठेवण्याची बाब समोर येत आहे.


जाहिरात कंपनी हे दूरसंचार कंपनी कडून ग्राहकाचे नंबर यादी घेऊन दिवसातून तीन ते चार कॉल येत असल्याने ग्राहकांना मनस्ताप डोके दुःखी होत असल्याची ओरड चालू झाली आहे.दूरसंचार कंपनीने नागरिकांचे फोन नंबर अशा जाहिरातदारांना देऊ नयेत.


मोबाईल धारक नागरिकांचे नंबर हे वैयक्तिक (पर्सनल) आहेत. जर आमचे वैयक्तिक (पर्सनल) नंबर जाहिरातदारांना द्यायचे असेल तर त्यांचा मोबदलाही जाहिरात कंपनीकडून आम्हाला देण्यात यावा.अशी मागणी त्रस्त जनतेनी केलेली आहे.