
✒️ शामभाऊ धुळे मुख्य संपादक मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी मुख्य संपादक) मो.9823995466



हदगाव (दिनांक 13 नोव्हेंबर) तालुक्यातील आष्टी येथे हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिपावळीनिमित्त खासदार आष्टीकर यांच्या शेत मळ्यामध्ये स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.




आज दिनांक 13 /11/ 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून दिपावळीनिमित्त संमेलन भोजनाचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती.यावेळी हिंगोली लोकसभेतील विविध भागातून अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खासदार नागेश पाटील यांना पुष्पगुच्छ व शाल व श्रीफळ देऊन स्वागत व शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांताताई पाटील,भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा (शरदचंद्र पवार) राष्ट्रवादी गटाचे स्टार प्रचारक दादासाहेब शेळके, माजी खासदार सुभाषराव वानखेडे,हदगाव व हिमायतनगर विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माधवराव पाटील जळगावकर, ॲड.संतोष जैन,इनायत उल्ला जनाब, सुभाषराव दिवेकर (सेवानिवृत्त डी वाय एस पी), ॲड. बाळासाहेब नाईक, जागीरदार, कृष्णा पाटील आष्टीकर, अशोकराव शिंदे तसेच महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वरुची भोजनाचा स्वाद घेतला तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हिंगोली लोकसभा क्षेत्रातील सर्व पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

