✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर उपसंपादक (मुख्य कार्यकारी महाराष्ट्र राज्य) मो.9823995466


उमरखेड (दिनांक 4 नोव्हेंबर) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे उमरखेड विधानसभा मतदार मध्ये अनुसूचित जातीसाठी (SC राखीव) मुळे 33 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते पण आज नोव्हेंबर रोजी एकूण 17 उमेदवार निवडणूक लढण्याकरिता मैदानात उभे राहिले आहे.

82 उमरखेड (अ.जा) विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 2024 यामध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार व त्यांना मिळालेली चिन्हे.किसन मारुती वानखेडे (भाजपा कमळ), राजेंद्र वामन नजरधने (रेल्वे इंजिन,मनसे), साहेबराव दत्तराव कांबळे (काँग्रेस हात) सुभाष मुकुंदराव रणवीर (बहुजन समाज पार्टी हत्ती), तातेराव मारुती हनवते (वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडर), देवानंद भारत पाईकराव (आझाद समाज पार्टी कॅटली), प्रज्ञेश रुपेश पाटील (राष्ट्रीय समाज पक्ष शिट्टी), बाळासाहेब यशवंत रास्ते (बळीराजा पार्टी ट्रम्पेंट),

आत्माराम संभाजी खडसे (अपक्ष अंगठी), अंकुश युवराज रंजकवाड (अपक्ष ऊस शेतकरी), विद्वान शामराव केवटे (अपक्ष खाट), विजयराव यादवराव खडसे (अपक्ष ऑटो रिक्षा), नथू संभाजी लांडगे (अपक्ष ट्रक), भाविक दिनाबाजी भगत (अपक्ष सफरचंद), डॉ.मोहन विठ्ठलराव मोरे (अपक्ष दूरदर्शन), मंजुषा राजू तिरपुडे (अपक्ष जहाज), राहुल साहेबराव शिरसाट (अपक्ष स्टूल) इत्यादी उमेदवार या 82 उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढविण्याकरिता सज्ज झालेले आहेत.

