
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (मुख्य कार्यकारी संपादक महाराष्ट्र राज्य) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 4 नोव्हेंबर) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे राजकारण सुरू झाले आहे.उमरखेड विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार विजयरावजी खडसे यांना काँग्रेस पक्षांनी उमेदवारी दिली नसल्यामुळे त्यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली आहे.मी विजय यादवराव खडसे गेल्या 49,50 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठेने काम केलं परंतु पक्षाने मला तिकीट नाकारले आणि एक दीड वर्षापासून एक नवीन आलेल्या माणसाला त्यांनी तिकीट दिले आहे. यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही. कधीच पक्षाचं काम केलं नाही, केवळ पैशाच्या भरोशावर काँग्रेसच्या लोकांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी या तिकीट वाटप केलं, म्हणून मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहे.

मी आमदार असतांना अनेक लोकांच्या सोबत जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणून या पद्धतीने वागलो. त्या ठिकाणी कुठेही गालबोट किंवा काही कोणत्या इतर गोष्टी केलेल्या नाही. माझी नाळ ही सामान्य माणसाची, गोरगरिबाची जमिनीची जोडलेली नाळ होती. परंतु काँग्रेस पक्षाने माझ्यावर या ठिकाणी अन्याय केला आणि एका पैसेवाल्या माणसाला, इच्छुक उमेदवाराला तिकीट दिलं.मला माझा फ्रॉम ठेवल्याच्या नंतर मला ऑटो रिक्षा निशाणी मिळाली आहे.

मला गर्व आणि अभिमान आहे की, आपल्या विभागाचे माजी आमदार नजरधने साहेब हे रिक्षा चालवायचे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब हे सुद्धा रिक्षा चालवायचे आणि तीच निशाणी ऑटोरिक्षा या ठिकाणी मला मिळालेली आहे. माझी आपल्या माध्यमातून आपणाला विनंती आहे की, मी जर व्यवस्थित असेल मी तर योग्य असेल तर माझ्या ऑटो रिक्षा चिन्हाचे बटन दाबून मला प्रचंड बहुमताने 20 नोव्हेंबर या तारखेला विजय करावं अशा आशयाचा आव्हान आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो. विजयराव खडसे (अपक्ष उमेदवार)अशी प्रतिक्रिया जनहित 24 न्यूज मुख्य कार्यकारी संपादक तथा महाराष्ट्र वायरल न्यूज तथा चे उपसंपादक पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांच्याशी बोलतांना दिली.यावेळी अनेक विजयराव खडसे यांचे समर्थन उपस्थित होते.
