✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014

महाराष्ट्र (दिनांक:- 3 नोव्हेंबर)
नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षासाठी आजवर आपण दिलेले योगदान लक्षात घेऊन आपली महाराष्ट्र प्रदेश नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके (स्टार प्रचारक) यांची चिटणीस या पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.


पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तमरित्या करून पक्ष मजबूत करण्यासाठी आपण सर्वशक्तीनिशी योगदान द्याल असा मला ठाम विश्वास वाटतो.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाची ध्येय-धोरणे तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो.


आपल्या नियुक्तीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ! अशा शुभेच्छा जयंत पाटील यांनी दिल्या.


शेळके यांची चिटणीस या पदावर यांची नियुक्ती केल्याबद्दल पत्रकार शामदादा धुळे (जनहित 24 न्यूज), जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर उपसंपादक महाराष्ट्र वायरल न्यूज, शहराध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड, पत्रकार करण भरणे जिल्हा उपाध्यक्ष भिम टायगर सेना यवतमाळ, कैलास कदम तालुका अध्यक्ष भीम टायगर सेना उमरखेड इत्यादी अनेक पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.