
मुख्य संपादक:- ✒️ शामभाऊ धुळे मो.9823142014
उमरखेड:- (दिनांक 2 नोव्हेंबर) 82 उमरखेड विधानसभा मतदार संघामध्ये साहेबराव कांबळे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नामांकन अर्ज दाखल केल्यावर त्यांची प्रतिक्रिया…


मी उमरखेड महागाव मतदार संघातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगारांची साधने उपलब्ध करून देणार, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार आहे.
उमरखेड महागाव विभागामधील आरोग्य सेवा सुधारली पाहिजे, सिंचनाचे क्षेत्र वाढली पाहिजे..! यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.

उमरखेड महागाव मध्ये विभागामध्ये शिक्षणापासून वंचित असलेले सर्व खेड्यापाड्यातील वस्तीमध्ये शिक्षण पोहोचण्याचा प्रयत्नशील राहणार आहे. अशी रोखठोक प्रतिक्रिया यावेळी दिली.


सध्या उमरखेड विधानसभाच्या जनतेच्या मुखातून एकच नावाची चर्चा होताना दिसून येत आहे.
साहेबराव कांबळे हेच एकमेव आणि सच्चा समाजसेवक असून त्यांनी विधानसभामधील गावा गावांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करत असून तेथील लोंकांचे व्यथा व अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

कांबळे यांनी अनेकांना वेगवेगळ्या स्वरूपात मदतीचा हात दिला आहे. म्हणूनच उमरखेड विधानसभाची जनता म्हणतांना दिसत आहे की, अब हात बदले का हालात आम्हाला संयमी आणि परिवर्तनवादी साहेबराव पाहिजे”…!