मोटरसायकल स्वरांना अज्ञात वाहनाने उडवले
[एकाचा जगात जागेवरच मृत्यू तर दुसऱ्याने ग्रामीण रुग्णालयात दम तोडला]

[महादेवाचे नवस फेडून येणाऱ्या दाजी मेव्हण्यावर काळाचा घाला]

✍🏻समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर प्रतिनिधी)
माहूर तालुक्यातील मौजे पानोळा येथील एकाच कुटुंबातील वीस ते पंचवीस भाविक ऑटोद्वारे महादेवाचे नवस फेडण्यासाठी आर्णी तालुक्यातील मौजे पांगरी या गावी महादेव मंदिरावर जाऊन पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून नवस फेडून परत येत असताना, यापैकी दोघेजण मोटरसायकल वरून माहूरवरून वाई बाजार मार्ग पानोळा जात असताना मौजे उमरा येथील राष्ट्रीय महामार्गावर त्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने प्रकाश परसराम राठोड वय 52 वर्ष याचे धडापासून शिर वेगळे झाले तर भारत धनसिंग राठोड वय 55 वर्षे यांच्या खांद्या जवळून हात मोडला.

या गंभीर धडकेत धडापासून शीर वेगळे झाल्याने प्रकाश जागीच गतप्राण झाला तर भारतने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दम तोडल्याची घटना दि 3 मार्च 2025 रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास घडल्याने प्रचंड हळूहळू व्यक्त होत आहे.

माहूर तालुक्यातील मौजे पानोळा येथील भारत धनसिंग राठोड वय 55 वर्ष आणि प्रकाश परसराम राठोड आपल्या परिवारासोबत आर्णी तालुक्यातील पांगरी येथील महादेव मंदिरावर दरवर्षीप्रमाणे नवस फेडण्यासाठी पुरणपोळीच्या नैवेद्य घेऊन गेले होते.परत येत असताना परिवारातील सर्व सदस्यांना त्यांनीऑटो द्वारे पाठवून दिले
आणि दोघेजण मोटरसायकलने माहूर मार्ग पानोळा जात असताना मौजे उमरा फाट्याजवळ आले असता त्यांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिली यामध्ये मोटरसायकल क्रमांक MH 29 F1242 चा चेंदामेंदा झाला तर प्रकाश परसराम जाधव यांचे शीर झाडापासून वेगळे झाले तर भारत धनसिंग राठोड यांच्या डाव्या खांद्याला भयंकर दुखापत झाल्याने फासोळ्यापासून ते खांद्यापर्यंत हात तुटून शरीरातील हृदयापर्यंत भयंकर जखम झाल्याने ते खाली पडले.
रस्त्याने जाणाऱ्यांनी 108 ला दूरध्वनीवरून कल्पना दिल्याने 108 ॲम्बुलन्स तात्काळ घटनास्थळावर पोहोचून गंभीर जखमी अवस्थेत जिवंत असलेले भारत राठोड यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथे उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला प्रकाश जाधव यांचे शीर जवळपास एक तास रस्त्यावरच होते.त्यावरून अनेक वाहने गेल्याचे प्रत्यक्ष दर्शनी सांगितले.

घटनेची कल्पना मिळाल्याने सपोनि शिवप्रकाश मुळे यांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत प्रकाश जाधव यांचे शीर आणि धड स्थानिकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात आणले येथे घटनेची नोंद झाल्यानंतर दिनांक 4 रोजी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.अक्षय सांगळे आणि आष्टाचे डॉ संदेश राठोड यांनी शवविच्छेदन केले घटना इतकी गंभीर होती की,

रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला होता ट्रामा केअर सेंटर असते तर जखमींचा जीव वाचवला गेला असता अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत होती.
एकाच घरातील जावई मेहुण्याचा अपघाती मृत्यू झाल्याने पानोळा गावासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत घटनेचा तपास सपोनी शिवप्रकाश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका गजानन चौधरी यांचे सह सिंदखेड पोलीस करीत आहेत.