
गैरहजर राहून शासनाचा पगार वेळेवर घेणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर यांनी केली आहे.
तालुका प्रतिनिधी समाधान कांबळे

माहूर :- गेल्या बऱ्याच वर्षापासून माहूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील काही पदे रिक्त आहेत दुर्गम भाग असलेल्या श्रीक्षेत्र माहूर तालुक्यामध्ये आरोग्य विषयक बऱ्याच समस्या उद्भवतात त्यामुळे शासनास विनंती आहे की बऱ्याच वर्षापासून रिक्त असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील सर्व जागा तात्काळ भरण्यात याव्यात,

तसेच माहूर शहरांमध्ये असलेल्या हदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपला दवाखाना व अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर हे फक्त नवापूर ते चालू न राहता प्रत्यक्षदर्शी संपूर्ण चालू करण्यात यावे तसेच माहूर तालुक्यातील संपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावरील काही अधिकारी व कर्मचारी हे विनापरवानगी हजर राहतात त्यासाठी एक भरारी पथक नेमून सर्व तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी.

असे निवेदन युवा ग्रामीण पत्रकार संघ माहूर यांनी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय माहूर यांना दिले आहे.