करण भरणे सर (ढाणकी प्रतिनिधी)

उमरखेड :- आपण नेहमी आपल्या जीवनात बघत आलो आहे की पोलीस हा कायदा व सुव्यवस्था राखण्याची तसेच मालमत्तेचे रक्षणाची जबाबदारी राखण्यासाठी व आवश्यक प्रसंगी बळाचा वापर करतो.

पोलिसामुळे आपण सुरक्षित आहोत. परंतु त्यांचे जीवन खूपच असुरक्षित आहे. तो त्यांच्या परिवाराचे विचार न करता नागरिक कसे सुरक्षित रहातील यासाठी तत्पर राहतात.त्यामुळे गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी पोलीस गुन्हेगारला सजा देतात.

पण यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी आपल्या जिल्ह्यात गुन्हेगार वाढू नये यासाठी त्यांनी संकल्पनेतून यवतमाळ जिल्हा पोलिस दलातर्फे ‘ऑपरेशन प्रस्थान’ राबवित आहे.

त्यांनी या संकल्पनेतून यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारीकडे वळणारी तरुणांचे पाऊले रोखण्यासाठी तसेच भरकटलेले व वाममार्गला लागलेले शाळा/कॉलेज सोडलेले तरुणाईला व बेरोजगारांना निःशुल्क विविध व्यावसायिक प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यसासाठी सुरक्षा रक्षक (Security Guard) सुरक्षा पर्यवेक्षक (Supervisor) पदा करिता ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे २०/०२/२०२५ रोजी राजस्थानी भवन, महागांव रोड, उमरखेड येथे भव्य रोजगार मेळावा आयोजीत केला आहे.
यात सुरक्षा रक्षक या पदासाठी 8 वी ते 12 वी पास किंवा नापास अर्ज करुशकता तर सुरक्षा परिवेक्षक या पदासाठी पदविधर आणि NCC ‘C’ सर्टिफिकेट वाले अर्ज करण्यासाठी पात्र रहाणार आहे.

यासाठी शैक्षणिक प्रमाणपत्र मार्कशीट, आधारकार्ड, मतदान कार्ड, बँक पासबुक (मुळ, झेरॉक्स), पोलीस व्हेरिफीकेशन, पासपोर्ट साईज फोटो (6), घेऊन सकाळी 9ते 5वाजेपर्यंत हजर राहण्याचे अव्हान यवतमाळ जिल्हा पोलीस दला तर्फे करण्यात आले आहे.