
(त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीदिनी रमामाता महिला मंडळाकडून हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले)
✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
उमरखेड:- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड येथील सम्यक बुद्ध विहार समोर त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांचे जयंती उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी दीप प्रज्वलन करत तथागत भगवान गौतम बुद्ध,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पर अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष इतिहासकार कवी लेखक सुधाकरराव लोमटे सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सरोजताई देशमुख (अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड), प्रबोधिनी किनाके (एसटी आगार प्रमुख), डॉ. सुनील कवडे सर (इतिहासकार), हिराबाई दिवेकर (माजी नगरसेविका) भगत मॅडम, पत्रकार सुनिल लोखंडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. वरील मान्यवरांनी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर प्रकाश टाकून नागरिकांना मार्गदर्शन केले.

यामध्येच कार्यक्रमाचे आयोजक रमामाता महिला मंडळ यांच्याकडून उमरखेड शहरात नव्हे तर तालुक्यात पत्रकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे, सामाजिक चळवळी मध्ये सर्वात पुढे असणारे, अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे सामाजिक कार्यकर्ता तथा शहराध्यक्ष भीम टायगर सेना आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये निर्भीड व निस्वार्थी पत्रकार म्हणून काम करणारे सिध्दार्थ ओमप्रकाश दिवेकर यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून पुरस्कार देऊन रमामाता महिला मंडळ आणि सुधाकर लोमटे सर, सरोज ताई देशमुख, डॉ. सुनिल कवडे इत्यादी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

हा पुरस्कार दिल्यामुळे तालुक्यातील पत्रकार सिध्दार्थ दिवेकर (उमरखेड प्रेस क्लब चे उपाध्यक्ष) यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतांना दिसून येते आहे.यावेळी रमामाता महिला मंडळाचे अध्यक्ष उषाताई इंगोले अध्यक्ष, भारतीताई केंद्रेकर उपाध्यक्ष, उज्वला धबाले, बेबाबाई गवंदे, कांचन दिवेकर, स्वाती दिवेकर मधुबाला दिवेकर, विद्या इंगोले, सुनिता दिवेकर, राखी धबाले, प्रज्ञा दिवेकर, शिल्पा धबाले,भारताबाई दिवेकर, ज्योती हटकर, रंजना आठवले, इत्यादींनी अथांग परिश्रम घेतलेत.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल दादासाहेब शेळके संस्थापक (राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना), अझरभाई खान (लोकदुत ज्येष्ठ पत्रकार), शामभाऊ धुळे (जनहित 24 न्यूज चॅनल मुख्य संपादक), बबलु भालेराव (महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनल), प्रसेनजीत दिवेकर, (तालुका प्रतिनिधी वंदे भारत न्यूज चॅनल),

प्रफुल दिवेकर, (शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी) शुद्धोधन दिवेकर (शहराध्यक्ष रिपब्लिकन युवा सेना), पत्रकार निशांत मनवर, पत्रकार प्रविण इंगळे, पत्रकार अत्तदीप धुळे, सुभाष वाघाडे मुख्य संपादक (महाराष्ट्र लाईव्ह न्यूज) इत्यादी अनेक मित्रांकडून प्रत्यक्ष भेटून आणि सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.