
✍🏻 समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)
श्रीक्षेत्र माहूर:- राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि.12 जाने. रोजी दु. 1 वा. स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवा निवृत्त प्राचार्य जयसिंग राठोड हे होते. तर सपोनि सुनील गायकवाड, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव डॉ. निरंजन केशवे, श्री रेणुकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य तुळशीराम गुरनुले, श्री जगदंबा विद्यालयाचे प्राचार्य विश्वास जाधव, विस्तार अधिकारी आत्राम, नगरसेवक सागर महामुने, माजी सभापती वसंत कपाटे, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार जोशी व पद्मा गिऱ्हे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
संस्थेच्या वतीने सर्व मान्यवर व पत्रकारांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.

यावेळी सपोनी सुनील गायकवाड, डॉ.निरंजन केशवे, प्रा.तुळशीराम गुरनुले,प्रा.विश्वास जाधव,वसंत कपाटे, नंदकुमार जोशी,इसा सय्यद,आत्राम व राठोड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी प्रयत्नाची कास धरून यशस्वी होण्याचे आवाहन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते या संस्थेतून यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपास आलेल्या प्रशिक्षणार्थीचा गौरव करण्यात आला.
तसेच विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले.प्रास्ताविक अंबूलकर यांनी तर सूत्रसंचलन के. पी. वाकोडे यांनी केले. ए. एल. रामटेके यांनी आभार मानले.
यावेळी पत्रकार व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जी.आय. पोद्दार यांचेसह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व सेवक आदींनी प्रयत्न केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.