
निर्भीड निस्वार्थी पत्रकार सिद्धार्थ दिवेकर यांचा यावेळी सत्कार
✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
उमरखेड:- दिनांक 14 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करत मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे पदाधिकाऱ्यांच्या वतीने “उमरखेड प्रेस क्लब” च्या उपाध्यक्षपदी निर्भीड निस्वार्थी पत्रकार सिद्धार्थ ओमप्रकाश दिवेकर यांचा सत्कार करण्यात आला.

चौकट :- या मंगलदिनी हा सत्कार स्वीकारतांना सिद्धार्थ दिवेकर म्हणाले की, समाज बांधवाकडून हा सत्कार माझ्यासाठी स्फूर्तीदायक आणि पेरणादायी आहे. यामुळे एक नवीन ऊर्जा माझ्यामध्ये निर्माण झालेली आहे.समाजाच्या सामाजिक बातम्या लावण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी या पत्रकार क्षेत्रामध्ये उतरलो आहे.
येणाऱ्या काळात निश्चितच समाजाची कोणत्याही प्रकारची बातमी प्रसार माध्यमांना प्रसारित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करीन. जय भीम सत्कार केल्याबद्दल सर्वांचे आभार व धन्यवाद करतो.

यावेळी बौद्ध उपासक यशवंत काळबांडे, वाघमारे, धम्मदीप काळबांडे, दत्तात्रय मुनेश्वर, दादाराव आठवले, जयवंत धुळे, गजानन भालेराव,पत्रकार सतीश कोल्हे, सारनाथ रोकडे, दिगंबर श्रवले, देविदास दुधाडे, भीमराव आठवले, सुदाम बरडे, बाळासाहेब सावतकर, आत्माराम हापसे, सी.सी मनवर, कानबा ढोले, लोखंडेताई अमोल कदम इत्यादी अनेक बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.