
माहूर (प्रतिनिधी) समाधान कांबळे
माहूर येथील सुप्रसिद्ध जीनियस किड्स इंटरनॅशनल स्कूल माहूर येथे राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंतीचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

भरपूर विद्यार्थ्यांनी या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि राजमाता जिजाऊ मासाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मनोहरन तर प्रमुख पाहुणे म्हणून रेणुकादास बेहेरे व पत्रकार अनिल माडपेलीवार होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्षांनी केलं तसेच या कार्यक्रमाला शाळेचे उपमुख्याध्यापक आहेफाज शेख,आकाश राठोड, अजय राठोड,सोहेल चव्हाण, सुधीर गोरखेडे राजू गंदेवाड . राहुल गिऱ्हे,रचना निळे, मुस्कान खान, विक्रांत . गजानन राठोड तसेच संगीता सोनवणे,लक्ष्मीताई उपस्थित होते.
कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन शाळेचे उपमुख्याध्यापक अहेफाज शेख यांनी केले.