✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड – (दि. 01 मार्च) तालुक्यातील विडूळ येथील मुलगी व दिल्ली येथील मुलगा सोशल मीडियाच्या माध्यमातून यांची मैत्री झाली.

मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला.मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्मातील असल्याने त्यांना लग्न करण्यास अडचण भासत होती,

मात्र परिवारातील लोकांनी एकत्र येत त्यांचा आदर्श प्रेम मंगल परिणय येथील हॉटेल अनुरत्नामध्ये शुक्रवार 28 फेबुवारी रोजी थाटामाटात साजरा करून दोन धर्मामध्ये जिव्हाळ्याचे संबंध बांधल्या गेल्याने मंगल परिणय साजरा करण्यात आला.

दिल्ली येथील सिख धर्मातील जसदिप रणजीत सिंग (28) आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ येथीलबौद्ध धर्मातील पल्लवी देवराव मुनेश्वर (23) यांचे मागील दोन वर्षापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख झाली त्याचे रुपांतर प्रेमात झाले.

मात्र लग्नाला जात,धर्म आडवा आला. त्यावेळी मुलाकडील रणजीत सिंग, गौरमीत कौर, अमरीत सिंग, अमणजीत कौर, प्रितपाल सिंग, अमणदिप सिंग, प्रितपाल सिंग व मुलीकडील ननान मुनेश्वर, मिलींद धुळे, अनिल कांबळे, सुबोध मुनेश्वर,

लक्ष्मण धुळे,गोवर्धन धुळे, अतुल धुळे या मंडळीने लग्नास होकार दिला आणि येथील हॉटेल मध्ये बौद्ध धर्म पद्धतीने लग्नसोहळा पार पडला असून जात आणि धर्माच्या भिंती तोडून हा आदर्श प्रेम मंगल परिणय संपन्न झाल्यामुळे वधु वरांच्या चेहऱ्यावर आनंदओसंडून वाहत होता.