✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)

उमरखेड :- भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शांतता कमिटी मीटिंगचे आयोजन सम्यक बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड उमरखेड येथे करण्यात आलेले होते.


यावेळी उमरखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार मा. शंकर पांचाळ साहेब यांनी आगामी सण उत्सवा संदर्भात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आनंदमय आणि उत्साह वातावरणामध्ये कशी संपन्न होईल यावेळी मार्गदर्शन केले.

पारंपारिक वाद्यांना स्वीकारून डीजे मुक्त जयंती साजरी करावी तसेच जयंती मिरवणूक मध्ये कोणीही दारू पिऊ नये असे आव्हान यावेळी करण्यात आले.तसेच डीजे वरील होणारा खर्च हा एखाद्या उच्चशिक्षित विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी लावावा असेही मत ठाणेदार पांचाळ यांनी व्यक्त केले.

या शांतता कमिटी मीटिंगचे प्रास्ताविक पत्रकार सिध्दार्थ दिवेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रफुल दिवेकर शहराध्यक्ष आझाद समाज पार्टी यांनी मानले.

यावेळी उपस्थित उमरखेड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी मा. शंकर पांचाळ साहेब व संतोष राठोड साहेब, माजी नगरसेविका हिराबाई दिवेकर, पत्रकार सिध्दार्थ दिवेकर शहराध्यक्ष भीम टायगर सेना, प्रफुल दिवेकर, संतोष इंगोले, मनोज इंगोले, प्रसेनजित दिवेकर, आकाश श्रवले , आकाश पाईकराव, योगेश दिवेकर ,अमोल दिवेकर,

रमामाता महिला मंडळ – अध्यक्षा उषाताई इंगोले, जिजाबाई दिवेकर, जनकाबाई इंगोले, भारतीताई केंद्रेकर, संगीता केंद्रेकर , मधूताई दिवेकर, कांचन दिवेकर, उज्वला धबाले, बेबाबाई गवंदे,विद्याताई इंगोले, सुनीता दिवेकर यांच्या सह रमामाता महिला मंडळ, तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.