
(कॉन्व्हेंट मधील तीन ते चार वर्षाचे विद्यार्थी बसमध्ये समावेश)
✍🏻 शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 25 जानेवारी) तालुक्यातील पळशी फाटा ते अंबाळी फाटा दरम्यान देशमुख यांच्या शेतालगत दहागाव वेलफेर इंग्लिश स्कूल शाळेच्या बस क्रमांक MH 29M 8488 ही आज सकाळी लिंबाच्या झाडाला जबर धडक दिल्याने कुमारी महिमा आप्पाराव सरकाटे ह्या १४ वर्षीय मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

महिमा ही दिवटपिंप्री या गावांमध्ये राहत होती. शाळेकरीता रोज बसने ये-जा करत होती पण आज काळाने तिच्यावर घात घालून एकुलत्या एक मुलीला आई-वडिलांपासून दूर केले आहे.

सदर घटना ही ह्रदय पिळवून टाकणारी आहे. महिमा वर्ग आठवी मध्ये शिकत होती.

या घटनेमुळे उमरखेड तालुका सह पिंपरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.या बस मध्ये कॉन्व्हेंट मधील ३ ते ४ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

बसमधील काही विद्यार्थ्यांना किरकोळ ईजा झाली तर काही विद्यार्थी सुखरूप आहेत अशी माहिती मिळाली आहे.पुढील तपास पोफाळी स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे हे करीत आहेत.