[गजानन सुरोशे मंडळ अधिकारी पुन्हा गर्जले]

✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) ✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)✍🏻करण भरणे (ढाणकी प्रतिनिधी) मो.94218 47351
उमरखेड (दिनांक २३ जानेवारी) तालुक्यात अवैध वाळू माफियानी वाळू चोरीचा उद्रेक केला आहे.

मनमानी राज असल्यासारखे रस्त्याने निष्काळजीपणाने हद्दपार झालेले वहान वाळू ने भरून रहदारी च्या ठिकाणी चालून लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचे लोक सोशिअल मीडिया वर व्यक्त करत होते.

याची दखल घेत उमरखेड चे कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी अवैध वाळू माफियाचे धाबे दणानून सोडणारे गजानन सुरोशे मंडळ अधिकारी यांना आदेश देताच आपल्या कर्तव्याशी इमानदारी ठेवणारे गजानन सुरोशे मंडळ अधिकारी यांनी दिनांक 23/01/2025 रोजी मौजे ढाणकी येथे 9:50 रात्रीला टेम्पो वाहन अवैध रेती वाहतूक करताना सिने स्टाईल पाठलाग करुन पकडले.

आणि तहसील कार्यालय येथे लावले. सदर कार्यवाही उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन सुरोशे मंडळ अधिकारी, पंजाब सानप संतोष जगताप, राजेश भंडारे, अक्षय शिंदे ग्राम महसूल अधिकारी ,सय्यद इबादुल्ला ,अभिलाष गायकवाड ,उदल राठोड महसूल सेवक यांनी संयुक्त कार्यवाही केली.