
(संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी)
✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
उमरखेड तालुक्यातील पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैध मटका व अवैध जुगार तात्काळ बंद करण्यात यावे. अशी मागणी शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) यांनी तक्रार निवेदनातून केली आहे.

तसेच मुळावा येथील बस स्टॅन्ड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर काउंटर मांडून अवैध मटका खुलेआम सुरू केला आहे.बस स्टॅन्ड हे रहदारीचे ठिकाण असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग, तरुण वर्ग व ज्येष्ठ नागरिक यांची ये – जा करण्याचा मुख्य मार्ग आहे.

अवैध मटका खुलेआम सुरू यामुळे शाळकरी विद्यार्थी, तरुण वर्ग हे वाईट मार्गाला लागली आहे.

यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आलेले आहे. तसेच अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहे, तसेच घराघरात भांडण,वाद होतांना दिसून येत आहे. या गंभीर बाबीकडे पोलीस प्रशासनाचे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे.

तरी जिल्हा पोलीस अधिक्षक साहेबांनी पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेले अवैध मटका व अवैध जुगार तात्काळ बंद करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे लेखी तक्रारी मध्ये शाम धुळे (जिल्हा कार्याध्यक्ष भीम टायगर सेना यवतमाळ) यांनी म्हटले आहे.