✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक)
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर ( कार्यकारी संपादक)
उमरखेड (दिनांक 17 डिसेंबर) येथील नाथ नगर येथील रहिवासी सुभाष हिरामण हनवते 43 वर्ष हे आपल्या राहत्या घरून दिनांक 29 नोव्हेबर 2024 रोजी निघुन गेले होते.

तेव्हा त्यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन उमरखेड शहरात दुपारी ३ वाजता सापडले होते.अशी तक्रार येथे दि. 30 नोव्हेबर 2024 रोजी उमरखेड पोलीस स्टेशनला दिली होती. त्या संदर्भात नातेवाईकांनी व पोलीस प्रशासनाने शोध घेतला असता. ते कुठेही आढळून आले नाही.

परंतु आज दि.16/12/2024 रोजी दुपारी दिड ते दोन वाजताच्या दरम्यान शहरालगत असलेल्या शेतमालक प्रकाश पाटील देवसरकर यांच्या उसाच्या शेतात मृत अवस्थेत आढळून आले.

मयत व्यक्तीचे शरीर कुजलेल्या अवस्थेत असल्यामुळे मृतदेहाचे शवविच्छेदन उमरखेड वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले.

व मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय शिंदे, एपीआय भगत, बीड जमदार संतोष चव्हाण, सुदर्शन जाधव हे पुढील तपास करत आहेत.