✍️ शामभाऊ धुळे मुख्य संपादक
✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक)
✍️समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)
माहूर :- (दिनांक ९ डिसेंबर) तालुक्यातील मौजे येथे अंजनखेड-सावित्रीबाई फुले माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय अंजनखेड येथे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमीत्त ६ डिसेंबर २०२४ रोजी सतत १८ तास अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थाध्यक्षा सौ विमल खराटे संस्था सचिव ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून तसेच प्राचार्या श्रीमती एन.एस. जयस्वाल व प्रा जयकुमार खराटे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम साकार झाला.मागील पंधरा वर्षापासून हा उपक्रम या विद्यालयात अविरतपणे राबविल्या जातो.

याव्दारे विद्यार्थांना अभ्यासाची व वाचनाची आवड निर्माण व्हावी ,वाचनसंस्कृती दृढ व्हावी तसेच विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढीस लागून चिंतन , मनन व्हावे. त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा. ह्या उद्दात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल.

यामध्ये इयता १० वी व १२ वी वर्गातील जवळपास २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीला.या सुत्य उपक्रमात विद्यार्थ्यांनी शांततेत व शिस्तीत अभ्यास करून आपल्या आयुष्याच्या शालेय जीवनातील वाचनाचा एक वेगळा आगळा अनुभव घेतला. या उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना रमेश राठोड सर (से. नि.शि.), दिनेश मेहेत्रे सर, प्रा राज कांबळे यांनी बिस्कीट, केळी चे वाटप करून या उपक्रमाला योगदान दिले.

तसेच अंजनखेड येथील रमाई महीला व तक्षशिला बौद्ध विहार समीती अंजनखेड यांच्या तर्फे उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना एक पेन, एक रजिस्टरचे वाटप करण्यात आहे. शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांना खिचडीचे वाटप करण्यात आले. या अभ्यास उपक्रमाचे उद्घाटना प्रसंगी प्रा. जयकुमार खराटे यांनी प्रतिमेचे पुजन करून अभिवादन केले.
समारोप प्रसंगी कु.शिवानी पेटकुले, कु. आदिती घाटगे कु सदफ ईस्माईल शेख या विद्यार्थ्यीनीनी आपला वाचनाचा अनूभव व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमातून आम्हाला वाचनाची आवड निर्माण होवून अभ्यासाची गोडी निर्माण झाल्याचे सांगीतले.
या उपक्रमाचे आयोजन शाळेत झाल्याने वाचनाची संधी मिळाली यासाठी शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या श्रीमती एन.एस. जयस्वाल मॅडम यांनी या उपक्रमाचे व विद्यार्थ्यांचे कोतूक केले. तसेच असाच निरंतर अभ्यास करून शाळेचे आई वडीलाचे नाव उज्वल करावे. डॉ बाबासाहेब आंबेडकराना प्रेरणास्थानी मानून मार्गक्रमण करण्याचे अवाहन केले या वेळी मंचावर पर्यवेक्षक एन.एम. राठोड सर, पी.एम. चव्हाण सर, वजीरे मॅडम, यु.जी. शेंडे सर , चौधरी सर , रबडे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या उपक्रमाचे नेतृत्व उच्च माध्यमिक प्रमुख प्रा. विनोद कांबळे यांनी केले. यासाठी प्रा. सतिष सुकावार, प्रा प्रेम सुर्यवंशी, प्रा अनिल जाधव प्रा राज कांबळे, प्रा . प्रविण बिरादार प्रा अश्विनी गोदरे, प्रा निर्मला राठोड, बाळू कुकडे, किशोरभाऊ यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सहशिक्षीका प्रणिता गौड यांनी केले.या स्तुत्य उपक्रमाचे जिल्हातून, पालक वर्गातून, वाचनप्रेमी वर्गाकडून कौतूकाचा वर्षाव होतांना दिसून येत आहे.