
✍️शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✍️सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
✍️समाधान कांबळे (श्रीक्षेत्र माहूर तालुका प्रतिनिधी)

टाकळी येथील असलम खान फारुकी यांच्या शेतावर ज़ख्मी कोल्हा आढळून आला. स्थानिकांच्या माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात कोल्हा गंभीर जखमी झाला होता.

असलम खान यांनी तत्काळ MH 29 हेल्पिंग हँड्स वाइल्ड ऍडव्हेंचर आणि नेचर क्लबच्या माहूरगड शाखेचे जिल्हा अध्यक्ष मोहनजी मूर्खे यांना ही माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच मोहन मूर्खे यांनी त्यांच्या टीम सदस्यांना घटनास्थळी पाठवले.
वनपरीक्षेत्र अधिकारी मा.रोहित जाधव सर वनपाल अली सर, माने सर आणि वनरक्षक वाघमारे सर तसेच सर्पमित्र भीमाशंकर सूर्यवंशी, मंगेश जोगदंड, राजू मूर्खे यांनी घटनास्थळी तत्काळ पोहोचून कोल्हा चे निरीक्षण केले.

जखमी कोल्हाला उपचारासाठी योग्य वैद्यकीय केंद्रात हलवण्यात आले. वन विभाग व सर्पमित्रांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे कोल्हाला नवे जीवन मिळाले.

स्थानिकांना भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.MH 29 हेल्पिंग हँड्स वाइल्ड अॅडव्हेंचर आणि नेचर क्लब, यवतमाळ(संपर्क: 9850577616 / 9922363538)वन्यजीव रक्षणासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प.