
✍️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✍️ सिध्दार्थ दिवेकर (कार्यकारी संपादक) मो.9823995466
✍️ समाधान कांबळे (श्रीक्षेञ माहुर तालुका प्रतिनिधी) मो.8265085447
माहूर :- (दिनांक 4 डिसेंबर) शहरासह तालुक्यातील अनेक गावात बिबट्याच्या दर्शनाने दहशत महिनाभराच्या जंगल सफारी नंतर माहूर शहरात बिबट्याने पुन्हा दर्शन देत धुमाकूळ घातल्याने उघड्यावर शौचास बसणाऱ्याची चांगलीच घाबरगुंडी झाली असून शहरातील जंगल व्याप्त असलेल्या मोकळ्या भुखंडावर बिबट्या फेरफटका मारत असल्याचे अनेकांच्या नजरेत पडले आहे.

आतापर्यंत शहरात मनुष्यहानी झाली नसली तरी ही शहरातील मोकाट कुत्र्याची व पाळीव प्राण्याची संख्या माञ घटली आहे. तसेच पाळीव प्राण्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यांवर वन विभाग काहीच उपाय करीत नसल्याने बिबट्याच्या हल्याचे प्रमाण वाढले असून अशा वेळी मानव – बिबट संघर्ष अटळ आहे. कारण वन विभाग झोपलेला आहे आणि बिबट्या मात्र जागा आहे.


महिण्याभराआधी माहूर शहरासह तालुक्यात बिबट्या आपल्या जोडीदार आणि दोन पिल्लासह धुमाकूळ घालत होते. त्यावेळी माहूर शहरात मोठ्या प्रमाणात दहशत पसरली होती.

जंगली प्राण्यांसह मोकाट कुत्रे, शेतात बांधलेल्या गुराढोरावर अनेक वेळा हल्ले करून ठार मारले.यानंतर शहरासह तालुक्यात बिबट्याचे दर्शन झाले नव्हते परंतु आता नर बिबट्या माहूर शहरातील जंगल व्याप्त असलेल्या भागात तसेच तहसील व परिसरातील जंगल आणि घरे असलेल्या भागात बिबट्याला दिवसा फिरतांना अनेकांनी पाहिले असून दि.१ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय परिसराला लागून असलेल्या जिनिंग प्रेसिंगच्या पडीक इमारतीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत शौचास बसलेल्या नागरिकांना बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने त्यांनी स्वच्छता न करताच घराकडे धूम ठोकल्याची चर्चा उडाल्याने परिसरातील नागरिकात घबराट पसरली आहे.

बिबट्याच्या डरकाळ्या वाढल्या असून दिवसाही बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे.त्यामुळे शेतीकामे करण्यास शेतकरी शेतात जाण्यास घाबरत आहे. तरी वनविभागाने तातडीने पिंजरा लावून त्या बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी नागरिकातून केली जात आहे.

चौकट:- तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचे हल्ले वाढले असून कालवडी,शेळ्या फस्त केल्या जात आहे तर दुसरीकडे बिबट्याचे हल्ले वाढून देखील वनविभाग सुस्त असल्याचे दिसत आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची अनेक वेळा मागणी करून देखील पिंजरा लावला जात नसल्याने आता काय माणवावर हल्ला होण्याची वाट वनविभाग पाहत आहे का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.