
(प्रहार जनशक्ती पक्षा,च्या वतीने सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन)
✒️ शामभाऊ धुळे (मुख्य संपादक) मो.9823142014
✒️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (कार्यकारी संपादक) मो.9823995466

उमरखेड (दिनांक 2 डिसेंबर) विधानसभेची निवडणूक लागायच्या काही, दिवसा पूर्वी भाजपच्या लोकप्रतिनिधी ने उमरखेड तालुक्यातील व शहरातील रस्त्याचे कोरोडो रुपयाचे शुभारंभ केले होते.


परंतू कुठल्याच रस्त्याचा मुहूर्त निघालेला नाही. मागच्या पंचवार्षीक पासुन सतत रस्ता डांबरीकरण उखळून रस्त्याची वाट लागली आहे.

रस्त्यावर जागो-जागी मोठ मोठे खडे पडल्या मुळे, वाहण धारकांना आपले वाहन चालवत असतांना, तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर काही वाहण धारक खड्यामुळे पडल्या मुळे, हात पाय फॅक्चर होऊन गंभीर दुखापत झालेले आहे व काही वाहन धारक मुत्युमुखी सुद्धा पडलेले आहे.

जर एखाद्या वेळेस गरोदर महिलेला प्रस्तुती साठी,आरोग्य केंद्रात नेण्याची गरज भासली तर,ह्या खड्ड्यामुळे रस्त्यातच गरोदर होईल,अशी भयानक व विदारक अवस्था तालुक्यातील सध्याच्या परिस्तिथी ला झालेली आहे.तरी सा.बा.विभागा ला रस्ता दुरुस्ती करण्यास मुहूर्त मिळत नसल्यामुळे या उमरखेड महागांव मतदार संघात, सर्व सामान्य नागरिक आपला संताप व्यक्त करत आहे.

असे निवेदन प्रहार च्या वतीने देण्यात आले यावेळी, प्रवीण इंगळे (बाळदी प्रहार शाखा प्रमुख), जळके(तालुका प्रहार प्रसिद्धी प्रमुख) अविनाश दुधे, प्रफुल वानखडे, दिपक ढोबळे व आदी उपस्थित होते.